शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्याकडे फाटलेल्या, जळालेल्या किंवा रंग लागलेल्या नोटा आहेत ? अशाप्रकारे घ्या बदलून...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 7:08 PM

1 / 4
नवी दिल्ली: कधीकधी आपल्या जुन्या सामानात किंवा कपड्यात एखादी फाटलेली,टेप लागलेली किंवा जळालेली नोट सापडते. अशी नोट दुकानदार किंवा इतर कुणीही घेत नाहीत. पण, अशा नोटा तुम्हाला बँकेतून बदलून मिळू शकतात. आरबीआयने अशा नोटा बदलण्यासाठी काही नियम बनवले आहेत. जाणून घ्या अशा नोटा बदलून घेण्याची पूर्ण प्रक्रिया.
2 / 4
बँकेचे नियम काय आहेत?- भारतीय रिझर्व्ह बँकच्या 2017 च्या चलन नोट नियमांनुसार, तुम्हाला ATM मधून खराब नोटा मिळाल्या तर तुम्ही त्या सहज बदलू शकता. कोणतीही सरकारी बँक अशा नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. नोट फाटलेली असेल किंवा इतर कुठल्या प्रकारे खराब झालेली असली, तरी बँकेला अशी नोट बदलून द्यावीच लागते. एखाद्या नोटेचा काही भाग गहाळ असला तरीही तो बदलला जाऊ शकतो. यासाठी, एक फॉर्म भरून RBI च्या इश्यू ऑफिसमधून बदलून घेऊ शकता.
3 / 4
किती पैसे परत मिळतील?- तुम्हाला तुमच्या नोटेची अवस्था आणि मूल्यावर किती पैसे मिळतील, हे अवलंबून आहे. काही नोटांच्या बाबतीत पूर्ण पैसे मिळतात. पण, जर नोट अधिक फाटली असेल तर तुम्हाला काही टक्के रक्कम परत मिळेल. उदाहरणार्थ, जर 50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटचा सर्वात मोठा तुकडा सामान्य नोटेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्याचे संपूर्ण मूल्य या नोटच्या बदल्यात मिळेल. आणि, जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा सामान्य नोटेपेक्षा 80 टक्के किंवा जास्त असेल, तर तुम्हाला या नोटेच्या बदल्यात संपूर्ण मूल्य मिळेल.
4 / 4
बँकेने पैसे घेण्यास नकार दिल्यावर ?- जर एखाद्या बँकेने तुम्हाला खराब नोटा घेण्यास नकार दिला, तर तुम्ही त्याबद्दल https://crcf.sbi.co.in/ccf/ मध्ये सामान्य बँकिंग // रोख संबंधित श्रेणीमध्ये तक्रार करू शकता. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. कुठलीच बँक एटीएममधून आलेल्या खराब नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. पण, बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंत नुकसान भरपाई देखील द्यावी लागू शकते.
टॅग्स :bankबँक