शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवाच्या दारीही नोकरी असुरक्षित, तिरुपती बालाजी मंदिरातील 1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 3:32 PM

1 / 8
देशात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याशिवाय, या लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानलाही होत आहे.
2 / 8
तिरूपती बालाजी मंदिरात काम करणाऱ्या 1300 कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट 30 एप्रिलला संपले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने 1 मे पासून कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यास मनाई केली आहे.
3 / 8
दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या 1300 कर्मचाऱ्यांना 1 मेपासून कामावर येणास नकार दिला आहे.
4 / 8
मंदिर प्रशासनाने सांगितले की, लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, त्यामुळे आता या 1300 कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट 30 एप्रिलपासून पुढे वाढवू शकत नाही.
5 / 8
तिरुमाला तिरुपती देवस्थान (TTD) ट्रस्टच्या माध्यमातून तीन गेस्ट हाऊस चालविण्यात येतात. या गेस्ट हाऊसची नावे विष्णु निवासम, श्रीनिवासम आणि माधवम अशी आहेत. नोकरीवरून काढण्यात आलेले हे सर्व 1300 कर्मचारी याच गेस्ट हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होते.
6 / 8
लॉकडाऊनमुळे सर्व गेस्ट हाऊस बंद आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढविण्यात आले नाही. तसेच, नियमित कर्मचाऱ्यांनाही सध्या कोणतेच काम सोपविण्यात आले नाही, असे तिरुपती बालाजी मंदिरचे अध्यक्ष व्हाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सांगितले.
7 / 8
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टीटीडी ट्रस्टचे प्रवक्ते टी. रवि यांचे म्हणणे आहे की, सर्व निर्णय कायद्यानुसार घेतले आहेत. काम बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
8 / 8
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद आहे. मात्र, मंदिरात रोज पूजा-पाठ पुजाऱ्यांकडून सुरु आहे. चालू आर्थिक वर्षासाठी या मंदिराचे बजेट 3309 कोटी रुपये आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट