शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2060 पर्यंत भारत बनणार सर्वाधिक मुस्लिम असणारा देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:13 AM

1 / 7
अमेरिकेच्या थिंक टैंक प्यू रिसर्च सेंटरने जगातील मुस्लिम संख्या असलेल्या देशांची आकडेवारी सादर केली आहे. त्याचसोबत 2060 मध्ये सर्वात जास्त मुस्लिम आणि ईसाई लोकसंख्या असलेल्या 10 देशांची यादी तयारी केली आहे.
2 / 7
सध्याच्या घडीला सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश इडोनेशिया आहे. जिथे 21 कोटी 99 लाख 60 हजार(2015 ची आकडेवारी) मुसलमान राहतात. तर मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आहे. चौथ्या स्थानावर बांग्लादेश तर पाचव्या स्थानावर नायजेरिया आहे.
3 / 7
प्यू रिसर्चच्या अहवालानुसार 2060 मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल. 2060 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19.4 टक्के लोक मुस्लिम असतील तर तेच प्रमाण जगाच्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्या 11.1 टक्के असेल.
4 / 7
तर दुसरीकडे 2060 मध्ये पाकिस्तानमध्ये 28.36 करोड मुस्लिम लोकसंख्या असेल आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असेल 2060 मध्ये पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येमध्ये 96.5 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची असेल
5 / 7
2060 मध्ये नायजेरियामध्ये 28.31 करोड मुस्लिम लोकसंख्या असेल तर जगाच्या तुलनेत नायजेरिया तिसऱ्या क्रमांकावर असेल. या सूचीत इंडोनेशिया चौथ्या क्रमांकावर असणार आहे. याठिकाणी 25.34 करोड मुस्लिम लोकसंख्या असेल.
6 / 7
प्यू रिसर्चच्या अहवालानुसार 2060 मध्ये बांग्लादेश पाचव्या, इजिप्त सहाव्या, इराक सातव्या, तुर्की आठव्या, 9 व्या स्थानावर ईरान आणि 10 व्या स्थानावर अफगाणिस्तान असेल.
7 / 7
2060 पर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून उदयास येईल. मात्र हिंदू लोकसंख्येच्या तुलनेत भारतात मुस्लिम अल्पसंख्याक असणार आहेत.
टॅग्स :Muslimमुस्लीमResearchसंशोधनIndiaभारत