1 / 6गुगल पे ज्याला सोप्या भाषेत जीपे म्हणतात तो भारतामध्ये ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठीचा आणि प्राप्त करण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. सर्वसाधारणपणे वापरकर्त्यांकडून याचा वापर हा बिल भरण्यासाठी, मोबाईलवर रिचार्ज करण्यासाठी तसेच इतर आर्थिक देवाण घेवाणीसाठी होतो. मात्र या नियमित वापरांसह गुगल पेचे इतरही काही फायदे आहेत ज्यांच्याबाबत सर्वसामान्य युझर्सनां फारशी माहिती नाही आहे. आज आम्ही तुम्हाला गुगल पेच्या अशा काही सिक्रेट फिचर्सबाबत सांगणार आहोत. 2 / 6जर तुम्ही मित्रांसोबत कुठे फिरायला गेलात आणि काही ऑर्डर केलं आणि त्याचं बिल तुम्हाला मित्रांमध्ये शेअर करायचं असेल, तर त्यासाठीचं खास फिचर गुगल पेमध्ये आधीपासून उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ एक ग्रुप बनवावा लागेल. त्यामध्ये तुम्ही ज्यांच्यासोबत बिल शेअर करू इच्छिता अशा मित्रांना जोडावं लागेल. त्यानंतर अॅप याबाबत स्वत:च हिशेब ठेवेल आणि कुणी पैसे दिले आणि कुणी नाही हे सांगेल. 3 / 6गुगल पे वर तुम्हाला प्रत्येक पेमेंटसाठी रिवॉर्ड मिळत नाही. मात्र काही खास प्रकारचे पेमेंट केल्यावर स्क्रॅच कार्ड मिळतात. विशेषकरून जेव्हा तुम्ही विजेचं बिल किंवा मोबाईल रिचार्ज करता, तेव्हा या स्क्रॅच कार्डवर तुम्हाला कॅशबॅक किंवा कुठल्याही दुकानातील डिस्काउंट कुपन मिळतात. तुम्ही तुम्हाला मिळणारे स्क्रॅच कार्ड पाहण्यासाठी रिवॉर्ड सेक्शनमध्ये जा. 4 / 6जर तुम्हाला दर महिन्याला नेटफ्लिक्स, Spotify किंवा युट्युब प्रीमियमसारख्या अॅप्सवरील पेमेंटची तारीख लक्षात ठेवण्यास अडचण येत असेल तर गुगल पे तुमची मदत करू शकतं. गुगल पेमध्ये ऑटो पे फिचर असतं. ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट आधीच सेट करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला पेमेंट करण्याची गरज भासणार नाही. 5 / 6याशिवाय तुम्ही गुगल पेवरून थेट तुमच्या बँकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेचं अॅप किंवा वेबसाईट उघडण्याची गरज भासणार नाही. हे फिचर पेमेंट करण्यापूर्वी बॅलन्स चेक करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यासाठी तुम्हाला एटीएममध्ये जाण्याची किंवा नेट बँकिंग करण्याची आवश्यकता भासत नाही.6 / 6तसेच जर तुम्ही कुणाला पैसे पाठवले तर तुम्ही त्याच्यासोबत एक छोटीशी नोटही लिहू शकता. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवले असतील, त्याला काही मेसेज पाठवणंही शक्य होतं. हे फिचर बजेट बनवण्यासाठी, कर भरण्यासाठी आणि ऑफिसच्या खर्चांचा हिशेब ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.