शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थायलंडमधील ही कमांडो ट्रेनिंग पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 3:54 PM

1 / 6
कोबरा गोल्ड ही आशियातील सर्वात मोठी लष्करी कवायत आहे. या लष्करी कवायतींमध्ये अमेरिका, थायलंड आणि अन्य देशातील कमांडोज सहभागी होतात.
2 / 6
थायलंडच्या किनारी भागात 10 दिवस चालणाऱ्या या संयुक्त सराव कवायतींमध्ये कमांडोजना 'जंगल सर्व्हाव्हयल प्रोग्राम' अंतर्गत अत्यंत बिकट परिस्थितीत जिवंत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
3 / 6
यावेळी थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कमांडोजना प्रशिक्षण दिले. विंचू आणि सापाच्या शरीरातील विष काढून त्यांना कसे खाता येईल, याविषयी कमांडोजना माहिती देण्यात आली.
4 / 6
जंगलात अडकून पडल्यानंतर कोणत्या वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करता येईल किंवा पाणी कसे शोधायचे,याचे धडेही कमांडोजना देण्यात आले.
5 / 6
जंगलात असताना काय खावे किंवा काय खाऊ नये, याचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
6 / 6
या लष्करी कवायतींमध्ये अमेरिकेचे 6800 सैनिक सहभागी झाले होते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल