1 / 8हिंदू धर्म हा केवळ भारत आणि नेपाळपुरताच मर्यादित नाही, तर ती एक जिवंत परंपरा आहे, जिने आपली छाप अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात सोडली आहे.2 / 8भारत हा हिंदू धर्माचे जन्मस्थान मानले जाते. जगातील ९५ टक्क्यांहून अधिक हिंदू येथे राहतात. पीयू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, २०२० पर्यंत, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७९ टक्के हिंदू होते, तर नेपाळमध्ये हा आकडा ८१ टक्के एवढा होता. 3 / 8भारतात हिंदू धर्म, हा केवळ धर्मच नाव्हे, तर त्याकडे जीवपद्धती म्हणूनही बघितले जाते. नेपाळ हे कधी काळी एकमेव हिंदू राष्ट्र होते. आज ते अधिकृतपणे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मात्र, हिंदू परंपरा तेथे खोलवर रुजलेल्या आहेत.4 / 8सर्वाधिक हिंदू असलेल्या 10 देशांपैकी आठ देशांत हिंदू अल्पसंख्यक आहेत. या प्रामुख्याने US (3.0 मिलियन), UK (1.1 मिलियन), UAE (1.1 मिलियन) यांचा समावेश आहे. या देशांत अधिकांश हिंदू प्रवासी म्हणून राहतात. याशिवाय, बांगलादेश आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो.5 / 8फिजीमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे २७ टक्के आहे. मात्र ही संख्या कमी होताना दिसत आहे. सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्येही मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे लोक राहतात. हे लोक, वसाहतकालीन कामगारांचे वंशज आहेत.6 / 8सिंगापूर आणि मलेशियामध्ये तमिळ हिंदूं मोठ्या प्रमाणावर राहतात. मॉरिशसमध्ये एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४८ टक्के हिंदू आहेत. मात्र असे असले तरी, एकूण संख्या केवळ ६.२ लाख एवढी आहे. यामुळे जगातील टॉप-१० हिंदू देशांच्या यादीत त्यांचा समावेश नाही.7 / 8भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात, हिंदूंचे एकूण प्रमाण काहीसे कमी झाले आहे. हे प्रामुख्याने लोकसंख्या वाढीच्या असमानतेमुळे आणि अंतर्गत स्थलांतरामुळे झाले आहे. याशिवाय, ओमानसारख्या आखाती देशांमध्ये अनिवासी भारतीयांमुळे हिंदूंचे प्रमाण काही प्रमाणावर वाढले आहे.8 / 8स्थलांतर आणि शिक्षणाच्या उद्देशाने युरोपियन देशांमध्ये जाणाऱ्या हिंदूंमुळेही संख्येत वाढ दिसून आली आहे. कोणत्याही देशात हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अथवा घट झालेली दिसत नाही, यामुळे परिस्थिती स्थिर असल्याचे दिसते.