लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 08:46 IST
1 / 8गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या भाजपासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक प्रतिष्ठेचं बनलं होतं. दरम्यान, आज रात्री १ वाजून ५६ मिनिटांनी हे विधेयक लोकसभेत पारित झाल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मतं पडली. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. 2 / 8आज वक्फच्या विधेयकावर मतदान होत असताना भाजपाच्या एनडीएतील मित्रपक्षांनी सरकारला भक्कम साथ दिली. या सर्व घडामोडींमुळे भाजपाने एका दगडात सहा शिकार करण्यात यश मिळवलं असून, त्याचे परिणाम पुढच्या राजकारणावर दिसून येणार आहेत. 3 / 8 वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित करून घेत भाजपाने आता विरोधी पक्षांना त्यांना हवी तशी सेक्युलॅरिझमची भाषा आता चालणार नाही, हे दाखवून दिलं आहे. 4 / 8दुसरा मुद्दा म्हणझे मुस्लिमांशी संबंधित प्रत्येक निर्णयाला मुस्लिम विरोधाच्या चौकटीत उभं करण्याचं राजकारण आता चालणार नाही. 5 / 8मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून आता राजकीय डाळ शिजणार नाही. 6 / 8मुस्लिमांशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन करून निर्णय बदलवून घेण्याचे मनसुबे आता यशस्वी होणार नाहीत. 7 / 8नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याच्या आधारावर उभ्या असलेल्या या सरकारला कमकुवत समजणं ही विरोधी पक्षांची चूक ठरेल.8 / 8लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या जागा वाढल्या होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातची निर्णय घेण्याची ताकद कमकुवत झालेली नाही.