शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असे आहे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेले शक्तिशाली हेलिकॉप्टर 'चिनूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 3:58 PM

1 / 7
अवजड साहित्य आणि युद्धसामुग्री वाहून नेण्यास सक्षम असलेलेे शक्तिशाही हेलिकॉप्टर चिनुक आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
2 / 7
भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंदिगड एअरबेसवर चार चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्याता आले.
3 / 7
दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात.
4 / 7
चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात.
5 / 7
सर्वप्रथम 1962 मध्ये चिनूक हेलिकॉप्टर वापरात आणले गेले होते. तेव्हापासून या हेलिकॉप्टर्सच्या तंत्रज्ञानात खूप बदल झालेला आहे.
6 / 7
व्हिएतनाम युद्धापासून अफगाणिस्तान आणि इराक युद्धापर्यंत अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा अमेरिकेने प्रभावी वापर केला होता.
7 / 7
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर दाखल झाल्याने हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. दुर्गम मार्ग आणि सीमारेषेवर बांधकाम प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये ही हेलिकॉप्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल