शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्नेहलता श्रीवास्तव यांना मिळाला लोकसभेच्या पहिला महिला महासचिव होण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 4:33 PM

1 / 6
स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. महासचिव म्हणून या पदावर विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
2 / 6
स्नेहलता श्रीवास्तव या १९८२ च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
3 / 6
स्नेहलता श्रीवास्तव यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
4 / 6
स्नेहलता श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
5 / 6
स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ असा असेल.
6 / 6
लोकसभेचे विद्यमान मुख्य सचिव अनुप मिश्रा हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाल्यानंतर स्नेहलता श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला.
टॅग्स :lok sabhaलोकसभा