1 / 8देशात आतापर्यत कोरोनाबाधितांची संख्या 84,712 वर पोहोचली आहे. तर 2700 हून अधिक लोंकचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. 2 / 8जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत 46 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 3 लाख 8 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.3 / 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहे. 4 / 8भारतातील कोरोनाला रोखण्यासाठी आयुर्वेदातही ती ताकद आहे का हे तपासण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे. अश्वगंधा ही आयुर्वेदिक वनस्पती कोरोना रोखण्यात किती प्रभावी ठरु शकते, यावर देशाचं आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय, आयसीएमआरनं क्लिनिकल चाचपणी सुरु केली आहे. 5 / 8अश्वगंधा ही औषधी गुण असलेली वनस्पती आहे. त्यात प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद असल्याचं काही अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी या वनस्पतीचा किती वापर केला जाऊ शकतो की नाही, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.6 / 8भारताला जगातील सर्वाधिक औषधांचं उत्पादन करणारा देश म्हणून ओळखले जाते. तसेच भारतात पोलिओ, मेनिंजायटीस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, गोवर, गालगुंड आणि रुबेला लस किंवा औषधं पूरक बनवली जातात. त्यामुळे कोरोनावरही मात करण्यासाठी भारत लवकरचं लस तयार करेल असा विश्वास जगभरातून व्यक्त केला जात आहे. 7 / 8भारतातील हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची खूप चर्चा झाली. मात्र त्याबाबत अनेक मेडिकल तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. तसेच हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचे अनेक साईड इफेक्टही होतात. मात्र अश्वगंधामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, असाही दावा केला करण्यात आला आहे.8 / 8 कोरोनावरील उपचारांसाठी कोणतीही लस दिली गेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपली लस तयार करण्यास किमान एक वर्ष लागणार असल्याचे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारत यासह 50 देशांमध्ये, शास्त्रज्ञ आज कोरोना लस तयार करण्यासाठी काम करत आहेत.