शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

S Jaishankar in US: जयशंकरनी अमेरिकेला अमेरिकेतच धु धु धुतले! भारतातील वक्तव्यांचे जोरदार प्रत्यूत्तर दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 3:05 PM

1 / 8
अमेरिकेचे एनएसए आणि मंत्री काही दिवसांपूर्वी भारतात येऊन गेले. इथे त्यांनी भारताला रशियावरून धमक्या देण्याचेच काम केले. याला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी थेट अमेरिकेत जाऊन प्रत्यूत्तर दिले. असे करणारे ते पहिलेच असल्याचा दावा नेटकरी करू लागले आहेत.
2 / 8
भारताने रशियाची एस-४०० ही मिसाईल सिस्टिम विकत घेतली आहे. रशिया-भारताच्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. युक्रेन युद्धाच्या काळात भारतावर निर्बंध लादण्याची धमकी अमेरिका वारंवार देत आहे. यावरून जयशंकर यांनी आम्हाला त्याची फिकीर नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, अशा कडक शब्दांत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले आहे.
3 / 8
भारत आपल्या सुरक्षेसाठी जे काही शक्य असेल ते करेल, कोणत्याही प्रतिबंधांची पर्वा करणार नाही. अमेरिकेने CAATSA कायदा बनविला आहे, त्यांना निर्बंध लादायचे असतील तर खुशाल लादूदेत. भारत आपल्या संरक्षणाच्या हिताचे निर्णय घेईल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
4 / 8
भारताने जेव्हा रशियासोबत एस-४०० साठी करार केला होता, तेव्हापासून अमेरिका भारतावर निर्बंध लादण्याच्या धमक्या देत आहे. ही सिस्टिम भारतात आली तेव्हा देखील अमेरिका बरळला होता. परंतू निर्बंध लादले नव्हते. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनी आणि अनिवासी भारतीय असलेल्या एनएसएने भारतात येऊन पुन्हा तो विषय छेडला होता.
5 / 8
यानंतर जयशंकर यांनी अमेरिकेला रशियन तेलाच्या मुद्द्यावरून झोडपले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉयड आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी अमेरिकेची बोलती बंद केली. अमेरिकेने रशियन तेलावरून भारताकडे बोट दाखविण्यापेक्षा युरोपकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत सुनावले आहे.
6 / 8
तुम्हाला जर आम्ही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, याची चिंता वाटत असेल तर माझा तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्हाला युरोपवर लक्ष द्यावे लागले. भारत आपल्या उर्जा मागणीच्या खूप कमी प्रमाणावर रशियातून तेल मागवितो. मात्र, आम्ही रशियाकडून एका महिन्यात जेवढे तेल घेत नाही, त्यापेक्षा जास्त तेल युरोप एका दिवसाला खरेदी करतो, हवे असतील तर आकडे पहा, असे जयशंकर म्हणाले.
7 / 8
ब्लिंकन यांनी भारतातील मानवाधिकार रेकॉर्डवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर जयशंकर यांनी म्हटले की, जसा तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, तसाच आम्हालाही तुमच्यावर बोलायचा अधिकार आहे. आम्ही यावर शांत बसणार नाही अमेरिकेतही मानवाधिकारांचे उल्लंघन होतेय, असा इशाराच जयशंकर यांनी दिला आहे.
8 / 8
यावर भारतीय नेटकरी तुटून प़डले आहेत. भारतद्वेष्ट्या अमेरिकेला पहिल्यांदाच असे कोणत्यातरी भारतीय मंत्र्याने झोडपले असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. काही जण तर मोदींनी जयशंकर यांना फ्री हँडच दिल्याचे म्हटले आहे.
टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया