शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 7:15 AM

1 / 8
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या काही श्रमिक विशेष गाड्या चालवत येण्यात येत असल्या तसेच 1 जूनपासून रेल्वेकडून 200 गाड्या चालवण्यात येणार असल्या तरी रेल्वेची नियमित वाहतूक सध्यातरी सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे.
2 / 8
मात्र असे असले तरी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा रुळावर आणण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
3 / 8
त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने पूर्वीप्रमाणे 120 दिवस आधी प्रवासी आरक्षण करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. आता 31 मेपासून प्रवासी आगावू आरक्षण करू शकतील. 31 मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून आरक्षणासाठी बुकिंग काऊंटर सुरू होतील.
4 / 8
तसेच 31 मेपासून प्रवाशांना तातडीच्या प्रवासासाठी तत्काळ आरक्षणही करता येणार आहे.
5 / 8
त्याशिवाय 1 जूनपासून सुरू होणाऱ्या 230 रेल्वेगाड्यांसाठी 1 जूनपासून पार्सल बुकिंगही सुरू होणार आहे. 31 मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बुकिंग काऊंटर सुरू होतील.
6 / 8
भारतीय रेल्वेने 1 जूनपासून 200 रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 22 मेपासून आरक्षणाचीही सुरुवात झाली आहे. या रेल्वे गाड्या श्रमिक आणि एसी गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील.
7 / 8
लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा 22 मार्चपासून बंद होती. दरम्यान, रेल्वेने 12 मेपासून 15 मार्गांवर 30 विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे.
8 / 8
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. त्यासाठी प्रवाशांना प्रवासापूर्वी एक तास आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचणे अनिवार्य आहे. तिथे प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येईल. मास्क अनिवार्य असेल. तसेच स्टेशनवर प्रवेश करण्याचे आणि एक्झिटचे मार्गही वेगळे असतील.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या