शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Railway Concession to Senior Citizen: ज्येष्ठांसाठी रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरु होणार, पण नियम, अटी बदलणार; केंद्राच्या मनात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:33 AM

1 / 8
रेल्वेने कोरोनामध्ये वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेली तिकीटातील सवलत रद्द केली होती. कोरोना गेला तरी रेल्वेने ही सवलत सुरु करण्याचे नाव काढले नव्हते. अनेकदा प्रश्न विचारूनही रेल्वे मंत्र्यांनी यास नकार दिला होता. आधीच रेल्वे कमी रुपयांत प्रवासी सेवा देते, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा कमी किंमतीत तिकिटे देणे शक्य नसल्याचे ते म्हणाले होते. परंतू, सरकार यावर विचार करत आहे.
2 / 8
य़ावरून केंद्रावर टीका झाली होती. यामुळे वरिष्ठ नागरिकांसह, खेळाडू आणि अन्य कॅटेगरीसाठी सवलतीच्या दरात तिकीट (Concession Ticket) देण्यावरून पुन्हा विचार सुरु केला आहे. मात्र यामध्ये जुन्या नियम अटी बदलण्यात येणार आहेत.
3 / 8
सुत्रांनुसार सरकार यातील नियम, अटी आणि वयाच्या मर्यादेमध्ये बदल करू शकते. पूर्वी ५८ वर्षांच्या महिला आणि ६० वर्षांच्या पुरुष यांना तिकीटात सवलत दिली जात होती. हे वय ७० वर्षे करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे वृद्धांना सूट देताना होणारे नुकसान ६० ते ७० वयोगटातील पॅसेंजरकडून भरून घेणार आहे.
4 / 8
मार्च 2020 पूर्वी, ज्येष्ठ नागरिक महिलांना तिकीट दरात 50 टक्के आणि पुरुषांना 40 टक्के सवलत देत होती. ही सवलत सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये होती. परंतू आता ती फक्त सिटींग आणि स्लिपर कोच साठीच असण्याची शक्यता आहे.
5 / 8
म्हणजे प्रवासी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या दरात एसी डब्यांतून प्रवास करू शकणार नाहीत. त्यांना एसीच्या थ्री, टू टायर डब्यांतून प्रवास करायचा असल्यास समान्य दरातच तिकीटे काढावी लागण्याची शक्यता आहे.
6 / 8
रेल्वे अशाप्रकारची सवलत देऊन ज्येष्ठ नागरिकांना मदत करत होती. परंतू आम्ही ही सेवा कायमची बंद करू, असे कधीही म्हटलेले नाही. यावर विचार सुरु असून त्यानंतर पुन्हा ही सेवा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे या सूत्राने सांगितले.
7 / 8
रेल्वे सर्व ट्रेनमध्ये प्रिमिअम तात्काळ योजना सुरु करण्याचा देखील विचार करत आहे. यामुळे महसूल वाढण्यास मदत मिळणार आहे. त्याद्वारे जी सूट विविध कॅटेगरींना दिली जाते, ती भरून काढण्यास मदत मिळणार आहे. ही योजना सध्या ८० ट्रेनना सुरु आहे.
8 / 8
ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यामागचे मोठे कारण म्हणजे बहुतेक वृद्धांकडे उत्पन्नाचा स्रोत नसतो. परंतू कोरोनानंतर सरकारने त्यांना रेल्वे प्रवासासाठी दिलेल्या सवलती स्थगित केल्या आहेत, अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवास महाग ठरत आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSenior Citizenज्येष्ठ नागरिक