शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बालाकोट एअरस्ट्राइक करण्यासाठी जिथून उडाली होती लढाऊ विमानं, तिथेच तैनात होणार राफेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:12 PM

1 / 12
भारतात लवकरच राफेल विमानं दाखल होणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.
2 / 12
अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.
3 / 12
अंबाला एअरफोर्स स्टेशन हे भारतीय हवाई दलाचे महत्त्वाचे स्टेशन आहे, जे कधी काळी नष्ट करण्याचा पाकिस्तानने कट रचला होता. पण पाकिस्तान काहीही करण्यापूर्वी भारताच्या जवानांनी त्यांना पुरतं जेरीस आणलं होतं.
4 / 12
अंबाला एअरफोर्स स्टेशन भारतीय वायुसेनेच्या वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत येते. 1965 आणि 71ची लढाई असो किंवा 1999मधील कारगिलचं युद्ध, अंबाला एअर फोर्स स्टेशनवरून उड्डाण करणा-या लढाऊ विमानांनी शत्रूला पळता भुई थोडे केले होते.
5 / 12
देशाच्या स्वातंत्र्यानंतर अंबाला येथे पहिली हवाई पट्टी बांधली गेली. येथे त्यावेळी सेपेकट जग्वार फाइटरची स्क्वाड्रन 5 आणि स्क्वाड्रन 14 ही लढाऊ विमानं होती. इथेच त्या काळातील सर्वात धोकादायक लढाऊ विमान मिस -21 बाइसन हेदेखील तैनात करण्यात आले होते. 1948मध्येच फ्लाइंग इन्स्ट्रक्शन स्कूल बांधले गेले होते, परंतु 1954मध्ये ते चेन्नईजवळील तांबाराम येथे हलविण्यात आले.
6 / 12
अंबाला एअरफोर्स स्टेशनपासून भारत-पाक सीमा अवघ्या २२० किमी. अंतरावर आहे, तर चिनी सीमा येथून 450 किमी अंतरावर आहे. म्हणजेच आमची लढाऊ विमानं काही मिनिटांत कारवाईसाठी तयार करता येणं शक्य होणार आहे. देशभरात 60 विमानतळं आहेत. ज्यामध्ये अंबाला एअरफोर्स स्टेशन हवाई दलाच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. ही सर्व हवाई दल स्थानके भारतीय हवाई दलाच्या 7च्या कमांडखाली आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी ती पाठवली जातात.
7 / 12
पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करण्यासाठी अंबाला एअर फोर्स स्टेशनवरूनच मिराज या लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते. मिराजची सर्व लढाऊ विमानं 30 मिनिटांत मिशन पूर्ण करून शत्रूंच्या हद्दीतून परत आली होती. 1947-48मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना पळवून नेण्यात आले, तेव्हा भारतीय वायुसेनेच्या वेस्टर्न एअर कमांड अंतर्गत येणारे अंबाला हवाई दल स्टेशन काश्मीरच्या सेवेत कार्यरत होते.
8 / 12
1962च्या भारत-चीन युद्धातही अंबाला हवाई स्टेशनवरून उड्डाण केलेल्या विमानांनी शौर्य दाखवले होते. 1965 आणि 1971मध्ये पाकिस्तानला भारतानं चांगलीच धूळ चारली होती. त्याशिवाय 1986मध्ये ऑपरेशन पवन आणि 1999मध्ये कारगिलमध्ये ऑपरेशन व्हाइट सी ही आदेशानुसार चालविण्यात आली होती. 1965मध्ये युद्धाच्या वेळी पाकिस्तानने अंबाला एअर फोर्स स्टेशनवर बॉम्बही टाकले. 20 सप्टेंबर 1965 रोजी पहाटे 3 वाजता पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी अंबाला एअरबेसला लक्ष्य केले.
9 / 12
अंबाला एअरबेस उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा उद्देश होता. सर्वात धोकादायक लढाई 1971मध्ये घडली. या युद्धात अंबाला हवाई दल स्थानक नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. 3 डिसेंबर 1971मध्ये संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी पाकिस्तानी हवाई दलाने श्रीनगरवर १२ सेबर फायटर जेट, अमृतसरमध्ये चार मिराज आणि पठाणकोटमध्ये चार सेबरनं हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पाच हल्ले केले.
10 / 12
अमृतसर, अंतीपूर, फरीदकोट, हलवारा, सिरसा आणि सरसावा येथेही हल्ला झाला. पण पाकिस्तानची विमानं भारताचं जास्त नुकसान करू शकले नाहीत. अमृतसरमधील धावपट्टीचा काही भागच खराब झाला.
11 / 12
या हल्ल्यानंतर थोड्या दिवसानंतर 14 डिसेंबर 1971 रोजी फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखॉन आपल्या जेनेट विमानासह नियमित विमानात होते. अचानक 6 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला.
12 / 12
निर्मल जीतसिंग सेखॉन यांनी दोन लढाऊ विमानांवर गोळीबार केला. परंतु त्यानंतरही चार लढाऊ विमानांनी त्यांना घेरले आणि हल्ले करत राहिले. निर्मल जीतसिंग सेखॉन यांनी त्या पाकिस्तानी लढाऊ विमानांशी शेवटपर्यंत संघर्ष केला.
टॅग्स :Rafale Dealराफेल डील