शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 3:01 PM

1 / 12
अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलांचे पूजन झाले.
2 / 12
दरम्यान, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनुमान गढी येथे जाऊन पारंपरिक पद्धचीने पूजा केली. अयोध्येमध्ये श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमानगढी येथील मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे.
3 / 12
हनुमानगढी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिरातील प्रमुख पूजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांनी पगडी आणि चांदीचा मुकुट देऊन स्वागत केले.
4 / 12
अयोध्येच्या बरोबर मध्यावर हनुमागनढी येथे रामभक्त हनुमानाचे मंदिर आहे. अयोध्येत आल्यावर प्रथम बजरंगबलीचे दर्शन घ्यावे त्यानंतर इतर मंदिरात दर्शनासाठी जावे,अशी रीत आहे.
5 / 12
हनुमानगढी येथे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम जन्मभूमी येथे भूमीपूजनासाठी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर मोदींनी रामलल्लांना साष्टांग नमन केले.
6 / 12
पंतप्रधान मोदींनी येथे आजच्या दिवसाची आठवण म्हणून पारिजातकाचे रोपटे लावले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
7 / 12
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मोदींनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. तसेच राम मंदिराच्या कोनशिलेचे पूजन करून मंदिराच्या बांधकामाची मुहुर्तमेढ रोवली.
8 / 12
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आज दुपारी बारा वाजून ४४ मिनिटे आणि ८ सेकंदांचा शुभ मुहुर्त काढण्यात आला होता.
9 / 12
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान एकूण ९ शिळांचे पूजन करण्यात आले. याशिवाय भगवान श्रीरामांची कुलदेवी कालीमातेची पूजासुद्धा करण्यात आली.
10 / 12
दरम्यान, आजच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर राममंदिराच्या उभारणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
11 / 12
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या उभारणीसाठी वेळमर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार २०२४च्या पूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
12 / 12
दरम्यान, राम मंदिराच्या बांधणीसाठी देशभरात जिथे जिथे शिलांचे पूजन झाले. त्यातील सर्व शिळांचा वापर राम मंदिराच्या उभारणीसाठी करण्यात येणार आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी