By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:33 IST
1 / 8भारत-पाकिस्तान सीमेजवळ स्वदेशी बनावटीच्या प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून सह-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. साधारण २५ मिनिटांच्या या उड्डाणाने भारताच्या 'आत्मनिर्भर' संरक्षण सिद्धतेचे दर्शन जगाला घडवले.2 / 8ऑलिव्ह ग्रीन गणवेश आणि हेल्मेट परिधान केलेल्या राष्ट्रपतींनी पोखरण फायरिंग रेंजच्या वरून उड्डाण केले. कॉकपिटमधून देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात त्या म्हणाल्या, 'प्रचंड हेलिकॉप्टर हे आत्मनिर्भरतेचे सशक्त प्रतीक आहे. आपल्या वीर सैनिकांना माझे सलाम. जय हिंद!' 3 / 8हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले 'प्रचंड' हे जगातील एकमेव असे अटॅक हेलिकॉप्टर आहे जे ५,००० मीटर (१६,४०० फूट) पेक्षा जास्त उंचीवर लँडिंग आणि टेक-ऑफ करू शकते. सियाचीनसारख्या अतिउंच युद्धभूमीवर हे हेलिकॉप्टर गेम चेंजर ठरणार आहे.4 / 8याचा कमाल वेग २६८ किमी प्रतितास असून ५५० किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची याची क्षमता आहे. यात २० मिमीची गन, ७० मिमीचे रॉकेट आणि हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात आहेत.5 / 8ग्लास कॉकपिट, हेलमेट-माउंटेड डिस्प्ले आणि शत्रूच्या रडारला चकवा देणारी रचना यामुळे ते अत्यंत घातक ठरते.6 / 8२८ मार्च २०२५ रोजी संरक्षण मंत्रालयाने १५६ 'प्रचंड' हेलिकॉप्टर्ससाठी HAL सोबत ६२,७०० कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे. यामुळे भारतीय वायुसेना आणि पायदळ अधिक आधुनिक होणार आहे. 7 / 8ग्लोबल फायरपावर इंडेक्सनुसार, ८९९ हेलिकॉप्टर्ससह भारत सध्या जगात चौथ्या स्थानावर असून 'प्रचंड'च्या समावेशामुळे ही शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे.8 / 8'प्रचंड'चा वापर केवळ सीमेवरील गस्तीसाठीच नाही, तर शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करणे, दहशतवादविरोधी मोहिमा आणि टँकविरोधी युद्धातही केला जाणार आहे. दुर्गम हिमालयीन भागात शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे भारताचे सर्वात मोठे 'स्वदेशी शस्त्र' मानले जात आहे.