शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

14 दिवसांचे आयुष्य, 'O' सापडला, आता 'H' शोधला तर चंद्रावर क्रांती घडणार; चंद्रयान चमत्कार करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 1:03 PM

1 / 7
चंद्रयान ३ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरला ऑक्सिजन सापडला आहे. एवढेच नाही तर अन्य आठ खनिजे देखील सापडली आहेत. रोव्हरचे १४ दिवसांचेच आयुष्य आहे, आता उरलेल्या दिवसांत रोव्हरला चमत्कार करून दाखवावा लागणार आहे.
2 / 7
चंद्रावर ऑक्सिजन सापडला आहे. यामुळे ज्या शोधासाठी इस्त्रोने ही मोहिम आखलीय त्या पाण्याचा शोध रोव्हरला घ्यायचा आहे. यासाठी आता एच म्हणजेच हायड्रोजन शोधावा लागणार आहे. पाणी H2O या दोन घटकांपासून बनते. यामुळे ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन यापासून पाणी बनते.
3 / 7
जर चंद्रावर हायड्रोजन सापडला तर तिथे पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतील. आणि हे चंद्रयान ३ मोहिमेचे सर्वात मोठे यश असणार आहे. मानव चंद्रावर रहायला जाईल की नाही, हे दूर राहिले, परंतू चंद्रावरील विविध पैलुंचा उलगडा होऊ शकणार आहे. या दृष्टीने पुढच्या मोहिमा करता येणार आहेत.
4 / 7
प्रज्ञान रोव्हरने ऑक्सिजन (O) आणि सल्फर (S), अॅल्युमिनियम (Al), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr), टायटॅनियम (Ti), मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) खनिजे शोधली आहेत.
5 / 7
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे दावे केले जातात. पाणी जीवनासाठी आवश्यक आहेच पण त्याचे इतर उपयोगही आहेत. जर चंद्रावर पाणी सापडले तर ते यंत्रांना थंड ठेवण्यासाठी आणि रॉकेट इंधन तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते, जे अंतराळ मोहिमांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
6 / 7
चंद्रावर ऑक्सिजननंतर हायड्रोजन मिळणे हा अवकाश जगतातील अत्यंत महत्त्वाचा शोध ठरू शकतो. विविध देशांच्या अंतराळ संस्था अंतराळवीराला चंद्रावर सहज पाठवू शकणार आहेत. पिण्यासाठी आणि मशिन थंड ठेवण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. याशिवाय श्वास घेण्यायोग्य हवा किंवा इंधन देखील बनविता येणार आहे.
7 / 7
रोव्हरवर बसवण्यात आलेल्या लेझर ड्रायव्हन ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) उपकरणाद्वारे ही खनिजे शोधणे शक्य झाल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.
टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो