शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिमुरड्याला मिळालं आईचं प्रेम, खाकीवर्दीतल्या माणुसकीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 11:58 AM

1 / 5
पोलीस म्हटलं की काहींच्या डोळ्यासमोर नकारात्मक प्रतिमा तयार होते, मात्र याच पोलिसाच्या खाकी वर्दीमध्ये माणुसकीदेखील पाहायला मिळते. सध्या सोशल मिडीयावर काही फोटो व्हायरल होत आहेत ते पाहून तुम्हीही या महिला पोलिस कर्मचाऱ्याचं कौतुक कराल.
2 / 5
एटामध्ये दारुचं व्यसन असलेला युवक एका चिमुरड्याला आणि पत्नीला रस्त्यावर सोडून गेला. त्या पिडीत महिलेने पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार मांडली. त्यावेळी महिलेच्या कुशीत असणाऱ्या चिमुरडा भूकेने व्याकूळ होऊन रडत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
3 / 5
तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसाने त्या चिमुरड्यासाठी दुधाची पिशवी आणून त्याला दुध पाजलं. इतकचं नाही तर त्या महिलेला घरापर्यंत पोहचण्यासाठी पैसेही दिले.
4 / 5
मथुरा येथील कोसीकलामधील पिडीत महिला विनीता तिच्या पतीसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी एटा आली होती. त्याठिकाणी तिच्या नवऱ्याने दारू पिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादामध्ये पती विनोद कुमार पत्नीला आणि 9 महिन्याच्या चिमुरड्याला मध्यवाटेत सोडून निघून गेला.
5 / 5
महिलेने पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिथे उपस्थित असलेली महिला पोलीस कर्मचारी वर्षा पाल हिने त्या चिमुरड्यासाठी दुध आणून त्याला पाजले. तसेच घरी जाण्यासाठी महिलेला 200 रुपयेही दिले. तिच्या या कामामुळे सोशल मिडीयात तिचं कौतुक करण्यात येत आहे.
टॅग्स :Policeपोलिस