शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM नरेंद्र मोदींची सर्वात मोठी ३ तासांची मुलाखत घेणारे 'Lex Fridman' आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 20:50 IST

1 / 10
जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक भारतीय न्यूज चॅनेल उत्सुक असतो. पंतप्रधान मोदी क्वचितच माध्यमांना मुलाखती देतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी प्रत्येक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती. मात्र पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३ तासांची मुलाखत घेण्यात आली आहे.
2 / 10
पंतप्रधान मोदींची आजपर्यंतची सर्वात मोठी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे लेक्स फ्रिडमॅन (Lex Fridman)...फ्रिडमॅन हे अमेरिकन पॉडकास्टर आहेत. फ्रिडमॅन यांच्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक आयुष्यापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील नात्यापर्यंत सर्व विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
3 / 10
पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३ तासांची मोठी मुलाखत रेकॉर्ड केली आहे. पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यापासून प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की मोदींची इतकी मोठी मुलाखत घेणारे लेक्स फ्रिडमॅन आहेत तरी कोण? चला तर मग जाणून घेऊया...
4 / 10
लेक्स फ्रिडमॅन यांचा जन्म सोवियत संघाचा भाग राहिलेल्या ताजिक सोवियत सोशलिस्ट रिपब्लिकमधील एका यहुदी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव एलेक्सई एलेक्सान्ड्रोविच फ्रिडमॅन असं आहे. लेक्स फ्रिडमॅन एक रिसर्च सायंटिस्ट आहेत. ते त्यांचं पॉडकास्ट Lex Fridman Podcast नावाने होस्ट करतात
5 / 10
लेक्स फ्रिडमॅन अमेरिकेत कॅम्प्युटर वैज्ञानिकही होते. २०१८ सालापासून ते पॉडकास्ट होस्ट करत आहेत. २०१५ साली मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये त्यांनी रिसर्चर म्हणून काम केले होते. २०१४ साली फ्रिडमॅन यांनी ड्रेक्जेलहून इलेक्ट्रिकल आणि कॅम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये पीएचडी पूर्ण केली.
6 / 10
फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये आजपर्यंत जगातील अनेक दिग्गज नेते, तंत्रज्ञान उद्योग जगतातील मान्यवर सहभागी झालेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतन्याहू, जेवियर माइली, एलन मस्क, मार्क जुकरबर्ग, जेफ बेजोस, सॅम ऑल्टमॅन, मॅग्नेस कार्लसन, युवल नोआ हरारी यांचा समावेश आहे.
7 / 10
फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये अनेक रंजक विषयांवर चर्चा होते. जसं आर्टिफिशयल इंटेलिजेंस, ग्लोबल पॉलिटिक्स, क्रिप्टोकरेन्सी, प्रोडक्विटी, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील तज्त्रांसोबत फ्रिडमॅन मुलाखतीत उत्तरे घेत असतात.
8 / 10
फ्रिडमॅन यांच्या युट्यूब चॅनेलला ४.८ मिलियनहून अधिक सब्सक्राईबर आहेत. त्यांच्या व्हिडिओला ८२ कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत. फ्रिडमॅन हे जगातील फेमस आणि प्रभावशाली पॉडकास्टर मानले जातात.
9 / 10
फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी मोदींची मुलाखत घेण्याच्या आदरासाठी ४५ तासापर्यंत केवळ पाणी पिऊन उपवास केला आहे. त्यावर मोदींनी उपवास हा वैज्ञानिक प्रक्रियेशी जोडला आहे. त्यातून अधिक ऊर्जा आणि जास्त मेहनत करण्याची ताकद मिळते असं सांगितले.
10 / 10
पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत त्यांची पर्सनल लाईफ, भारत पाकिस्तान संबंध, रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका त्याशिवाय गुजरात दंगलीवरही भाष्य केले आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPodcastsसखी टॉक्स