शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:00 IST

1 / 7
भारतापासून हजारो किमी अंतरावर असलेल्या त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. भेटी-गाठी, बैठका झाल्यानंतर त्यांच्यासाठी खास मेजवाणी ठेवण्यात आली होती. यात खास बाब म्हणजे त्यांना जेवण वाढलं गेलं ते सोहरीच्या पानावर.
2 / 7
सोहरीच्या पानावर वाढलेलं जेवण बघून मोदींना आनंद झाला. त्यांनी फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. 'बघा आपली भारतीय संस्कृती किती दूरपर्यंत विस्तारली गेली आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
3 / 7
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक वर्षांपू्र्वी भारतीय नागरिक रोजगाराच्या शोधात गेले. जाताना त्यांच्यासोबत भारतीय संस्कृती, परंपराही तिथे गेल्या. तिथे त्यांनी या पंरपरा जपल्या. त्यात सोहरीच्या पानावर जेवण करणंही त्यांनी जपलं.
4 / 7
भारतातही सोहरीच्या पानावर जेवण करण्याची पद्धती आहे. दक्षिण भारतात, पूर्व भारतातही अनेक ठिकाणी सोहरीची पाने जेवणासाठी वापरली जातात. या पानातील काही घटक जेवणात मिसळतात आणि जेवण स्वादिष्ट लागते असेही म्हणतात.
5 / 7
सोहरीच्या पानावर जेवण करण्याचे फायदेही आहेत. गरम गरम जेवण जेव्हा या पानावर वाढलं जातं, तेव्हा या पानातून विशिष्ट प्रकारचा सुगंध निघतो, तो जेवणात मिसळला जातो आणि जेवण आणखी चविष्ठ बनतं.
6 / 7
या पानामध्ये अँटिऑक्सिडंटचे घटकही आहेत, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या पानावर जेवण केल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. जेवण पटकन पचते. त्यामुळे या पानावर घरी आणि वेगवेगळ्या समारंभात जेवण वाढले जाते.
7 / 7
भारतात सोहरीच्या पानाबरोबरच काही भागांमध्ये केळीच्या पानाचाही वापर केला जातो. दक्षिण भारतात सोहरीच्या पानाचा वापर जास्त होतो, तर काही भागांमध्ये सोहरीची पान कमी उपलब्ध असल्याने तिथे केळीची पाने वापरली जातात.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान