PM मोदी काही दिवसांतच 9 कोटी शेतकऱ्यांना वाटणार 19 हजार कोटी; जाणून घ्या योजना, कुणाला होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 15:23 IST
1 / 10पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना 19,000 कोटी रुपये पाठवतील. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये येतील. (PM kisan sanman nidhi yojana 9th instalment funds will release on 9th August 2021)2 / 10पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकार दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. आता हा 9 वा हप्ता असेल.3 / 10यापूर्वी, 8वा हप्ता 14 मे रोजी आला होता. गेल्या वर्षी, पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नाताळच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी देण्यात आला होता. 4 / 10देशातील एक राज्य पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. मात्र, गेल्या वेळीच हे राज्यही या योजनेत सामील झाले.5 / 10काय आहे पीएम किसान योजना - पीएम-किसान अंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक सहाय्यता देते. दर चार महिन्यांनी एकदा दोन हजार रुपयांच्या रोख रकमेमध्ये पैसे दिले जातात.6 / 10कसा घ्याल पीएम किसान योजनेचा लाभ - पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार कार्डशिवाय कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 7 / 10तसेच, 2000 रुपयांचा हप्ता मिळविण्यासाठी बँकेत खाते असणेदेखील आवश्यक आहे. डीबीटीद्वारे खात्यात पैसे पाठवले जातात. तसेच बँक खात्याला आधारशी जोडणेदेखील आवश्यक आहे.8 / 10या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही दस्तऐवज सबमिट करणे बाकी असल्यास, आपण ते ऑनलाइन अपलोड करू शकता. जर तुम्ही अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नसेल तर, स्वतःच सरकारच्या वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.9 / 10जर आपण या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे जाणून घ्यायचे असेल तर pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. येथे लाभार्थ्यांची नवीन यादी अपलोड होत आहे. येथे राज्य/जिल्हा/तहसील/गावनिहाय आपण आपले नाव तपासू शकता.10 / 10पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली आहे.