पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:46 IST
1 / 7इथे भारतात पिढ्यान पिढ्या राहून भारतीयांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. तिकडे काश्मीरमध्ये पाकिस्तानी ओसामा सरकारी नोकरीची तयारी करत आहे. किती हास्यास्पद आहे म्हणण्यापेक्षा किती धोकादायक बाब आहे. एक पाकिस्तानी नागरिक व्हिसावर भारतात येऊन हे सर्व मिळवू शकत असेल तर देशाची सुरक्षा काय राहिली? आता जेव्हा पाकिस्तानात जायची वेळ आली तेव्हा या पाकिस्तानी तरुणाने हे सर्व सांगितले आहे. 2 / 7भाजपचे व्हिसलब्लोअर म्हटले जाणाऱ्या खासदारांनी पाच लाख पाकिस्तानी तरुणी, महिला लग्न करून भारतात दिलेल्या आहेत. या देशाच्या विविध भागात पाकिस्तानकडून पेरल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळविली जाते. किती मोठा भारताला धोका निर्माण झाला आहे, असा सवाल उपस्थित केला होता. यात पाकिस्ताने तयार केलेले दहशतवाद्यांचे स्लीपर सेल आहेतच. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. 3 / 7हा पाकिस्तानी तरुण, याचे नाव ओसामा आहे जो गेली १७ वर्षे भारतात बिनदिक्कत राहत आहे. त्याच्याकडे अधिकृत मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्डच नाहीतर डोमिसाईल सर्टिफिकेट पण आहे. त्याला आता पाकिस्तानला जायचे झाले तर जिवावर आले आहे. 4 / 7ओसामा हा रावळपिंडीचा आहे. तो २४ नोव्हेंबर २००८ ला काश्मीरच्या उरीमध्ये आला होता. येथे येताच त्याला व्हिसा स्टे मिळाला. त्याने भारतातूनच दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, त्याला पोलिस ठाण्यातून फोन आला आणि त्याला भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. 5 / 7ओसामा हा बीएससी कॉम्प्युटर सायन्स करत आहे. शेवटच्या वर्षाला आहे. जूनमध्ये परीक्षा होणार होती. यानंतर तो नोकरीची तयारी करणार होता. सरकारी नोकरीसाठी देखील तो तयारी करणार होता. परंतू, त्यापूर्वीच त्याला पाकिस्तानला जायची ऑर्डर आली आहे. 6 / 7२०-३० वर्षांपासून इथे राहणारी कुटुंबे कशी जातील? आम्हीही मतदान केले, आमची सर्व कागदपत्रे तयार आहेत, असे तो म्हणत आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी कुठे जाऊ? पाकिस्तानात माझे भविष्य काय आहे? भारताकडून भविष्याच्या अपेक्षा होत्या, असे हा ओसामा म्हणत आहे. 7 / 7या त्याच्या व्हिडीओनंतर भारतीय नागरिक त्याला ही कागदपत्रे कशी मिळाली असा सवाल करत आहेत. या पाकिस्तानी लोकांना भारतात आश्रय का दिला जातो, आपली व्यवस्था किती पोखरलेली आहे, हे लोक भारतात येऊन हेरगिरी करतात, भारतविरोधी कारवाया करतात असे म्हटले जात आहे.