शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 4:08 PM

1 / 5
नवी दिल्ली: ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली.
2 / 5
यावेळी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आल्यानंतर 'जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है', अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेला.
4 / 5
संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.
5 / 5
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून अनेक विधेयके या अधिवेशनात मंजूरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. या सगळ्याबाबत संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.
टॅग्स :BJPभाजपा