शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधींना भेटणारा ओरी कोण?; बॉलिवूड स्टार किड्ससोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 5:03 PM

1 / 8
ओरहान अवतारमणी उर्फ ओरी अनेकदा बॉलीवूड स्टार किड्ससोबत पार्टीज आणि हॉलिडेमध्ये दिसतो. स्टार किड्सप्रमाणे ओरहान देखील खूप प्रसिद्ध आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय राहतो.
2 / 8
गेल्या काही महिन्यांमध्ये तो स्टार किड्ससोबतच्या दिसण्यामुळेही चर्चेत होता. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत ओरीचा एक फोटो समोर आला आहे.
3 / 8
ओरीने राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. फोटोमध्ये राहुल गांधी आणि ओरी एकमेकांसोबत हसताना आणि पोज देताना दिसत आहेत.
4 / 8
हा फोटो शेअर करताना ओरीने लिहिले की, 'आज लंचमध्ये.' रिपोर्ट्सनुसार, ही बैठक लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली.
5 / 8
ओरीला पार्ट्या खूप आवडतात. हे त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतून दिसून येते. विशेष बाब म्हणजे जान्हवी कपूर, खुशी कपूर, अजय देवगणची मुलगी नीसा देवगण अशा अनेक स्टार किड्सचा तो जवळचा मित्र आहे.
6 / 8
ओरीचे वेगवेगळे फोटो कायम स्टारकिड्ससोबत वारंवार येत राहतात. ओरी सध्या नीसा देवगणसोबत लंडनमध्ये आहे. त्याने नीसासोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
7 / 8
ओरी हा मुंबईचा रहिवासी आहे. १९९९ मध्ये जन्मलेल्या ओरीच्या वडिलांचे नाव जॉर्ज आणि आईचे नाव शहनाज अवतारमाणी आहे. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना, ओरी हा अभिनेत्री सारा अली खानचा वर्गमित्रही होता. त्यांनी न्यूयॉर्कमधून कम्युनिकेशनमध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स कोर्स केला आहे.
8 / 8
ओरीने एका मुलाखतीत सांगितले की तो एक गायक, गीतकार आणि फॅशन डिझायनर आहे. ओरीचे इंस्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbollywoodबॉलिवूड