1 / 6लष्कर प्रमुख (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकताच जैसलमेरचे पोलिस अधीक्षक (एसपी) सुधीर चौधरी यांचा सन्मान केला. भारतीय सैन्याने आयपीएस अधिकाऱ्याचा सन्मान का केला असा सवाल अनेकांच्या मनात घोळत आहे. 2 / 6जैसलमेर हे पाकिस्तानी सीमेपासून अगदी जवळचे शहर आहे. सीमेपलिकडेच पाकिस्तानचा भारताने उडवून दिलेला रहीम यार खान एअरबेस होता. यामुळे जैसलमेरला मोठा धोका होता. याकाळात चौधरी यांनी जैसलमेरमध्ये कायदा व सुव्यस्था उत्तमरित्या राखली, तसेच सैन्याच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची मदत पुरविली म्हणून सैन्याने त्यांचा हा सन्मान केला आहे. 3 / 6द्विवेदी यांनी कौतुक केलेले सुधीर चौधरी हे राजस्थान केडरचे २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जनरल द्विवेदी हे राजस्थान सीमेवर असलेल्या कोणार्क कॉर्प्स सेक्टरमधील लॉंगेवाला येथील फॉरवर्ड बेसला भेट देणार होते. या दौऱ्यावेळी चौधरी यांचा सन्मान करण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 4 / 6पाकिस्तानसोबत काही सैन्याचेच युद्ध नव्हते, तर पोलीस दलाचेही होते. भारतीय वायुसेना (IAF) आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांची ही संयुक्त मोहिम असली तरी स्थानिक पातळीवर पोलिसांची मदतही तेवढीच महत्वाची होती. चौधरी यांनी हवाई दल आणि बीएसएफशी योग्यरित्या समन्वय साधला होता. यामुळे त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.5 / 6चौधरी हे सिकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर तहसीलमधील बागरिया बास या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी रुरकी येथे उच्च शिक्षण घेतले, जिथे त्यांनी बी. टेक पदवी मिळवली होती. यानंतर त्यांनी तीन ठिकाणी नोकरी केली होती. यामध्ये एक कार्पोरेट तर अन्यमध्ये मिलिट्री इंजिनिअरिंग व फॉरेस्ट खात्याची होती. अखेर त्यांनी आयपीएस होत महत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. 6 / 6आसाराम प्रकरणात वैद्यकीय प्रमाणपत्रातील घोटाळा उघड करण्यात चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच लॉरेन्स गँगकडून २०२३ मध्ये बॉलीवूड स्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या आरोपींनाही पकडण्यात चौधरी यांची भूमिका होती.