शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:48 IST

1 / 11
Operation Sindoor Surgical Air Strike: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन भारताने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' राबवले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून, ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केली. या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
2 / 11
भारतीय सैन्याने रात्री उशिरा १.३० वाजता हवाई हल्ले केले. यानंतर, भारतीय सैन्याने १.४५ वाजेपर्यंत हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय सैन्याने पीओकेमध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते .
3 / 11
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली. पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.
4 / 11
पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ८०-९० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
5 / 11
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या प्रगत लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद भागांना लक्ष्य केले. हे भाग बऱ्याच काळापासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. हवाई हल्ल्यात या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचे फोटोमध्ये दिसून येते.
6 / 11
हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना पाकिस्तानातील रुग्णालयात नेण्यात येत आहे. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. यात पाकिस्तानी सैन्याने श्रीनगर एअरबेसवर हल्ला केला आहे आणि दोन भारतीय विमाने आणि भारतीय ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे, असं सांगितले जात होते. पीआयबीने खोट्या बातम्यांची पडताळणी केली आहे आणि सत्य उघड केले आहे.
7 / 11
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान सतर्क आहे आणि भारताने हरयाणा आणि पंजाबमधील सर्व हवाई तळांवर हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
8 / 11
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पठाणकोट जिल्हा प्रशासन देखील सतर्क आहे. उपायुक्तांनी पुढील ७२ तासांसाठी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
9 / 11
भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतरची सद्याची परिस्थिती लक्षात घेता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील. पठाणकोटमधील सर्व शाळा ७२ तासांसाठी बंद राहतील.
10 / 11
भारतातही ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
11 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे. पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या पतींची हत्या केली होती. भारताने त्याचा बदला घेतला आहे.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान