शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:43 IST

1 / 10
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ असा इशारा दिला होता.
2 / 10
या हल्ल्याच्या १५ दिवसांनी ६ मे च्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. मागील एअर स्ट्राईकसारखे यावेळीही ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्याआधी गुप्तता पाळण्यात आली.
3 / 10
'ऑपरेशनच्या सिंदूर'वर २ रात्र आधी साऊथ ब्लॉकमध्ये सीक्रेट काम सुरू होते. या ऑपरेशनची भनक काही टॉप अधिकाऱ्यांनाच होती. साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचे ऑफिस आहे. तिथे आर्मी, नौदल आणि वायूदलाचे वरिष्ठ अधिकारी बसतात. इथेच ऑपरेशन सिंदूरवर रणनीती बनवली जात होती.
4 / 10
ऑपरेशन सिंदूरबाबत गुप्तता राहावी यासाठी २ दिवस आधी यात सहभागी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केले होते. कुणालाही त्यांना भेटता आले नाही. जे अधिकारी ऑपरेशन सिंदूरची तयारी करत होते, त्यांना ६ मे रोजी रात्री १० वाजता साऊथ ब्लॉकमध्ये बोलवण्यात आले. हे सर्व मिशन यशस्वी होण्यापासून जगाला याची माहिती देण्यापर्यंत सर्व तयारी करत होते.
5 / 10
ऑपरेशन पूर्ण होताच प्रेस रिलीज जारी - जसे आर्मी आणि एअर फोर्सने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात जात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर याची माहिती संरक्षण मंत्रालयाने पत्रक काढत सार्वजनिक केली. रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी हे पत्रक जारी करण्यात आले. १ वाजून ५१ मिनिटांनी भारतीय लष्कराने त्यांच्या सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगितले.
6 / 10
भारतीय लष्कराच्या हँडलवर ऑपरेशन सिंदूरचे चिन्हही आले. ज्यात नावामध्ये सिंदूर दाखवत त्याचा बदला पूर्ण केल्याचं म्हटले गेले. आर्मी अधिकाऱ्यांच्या टीमने रात्री साऊथ ब्लॉकमध्ये हे चिन्ह तयार केले. ते बनवण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे लागली.
7 / 10
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध पुरुषांचा बळी गेला. मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे समर्पक नाव देण्यात आले.
8 / 10
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लोक गुगलवर एअर स्ट्राइक, इंडियन आर्मी, इंडिया आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्च करत आहेत. पाकिस्तानमधील गुगल ट्रेंडनुसार ते आता सिंदूर म्हणजे काय, याची माहिती घेत आहेत
9 / 10
भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. या दहशतवादी तळांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा गड असलेल्या बहावलपूर आणि लष्कर-ए-तय्यबाचा अड्डा मुरीदके यांचा समावेश आहे.
10 / 10
विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात प्रथमच सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत जगाला माहिती दिली.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर