1 / 8भारताने गुरुवारी पहाटे आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानने आत्मघाती ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानांनी केलेले हल्ले यशस्वीपणे थोपविले आणि नष्टही केले. पाकिस्तानचे शेकडो ड्रोन आणि तीन लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. भारताची हवाई संरक्षण प्रणाली कमालीची यशस्वी ठरली आहे. काही वर्षांपूर्वी हमासने इस्रायलवर असा हल्ला केला होता, तो इस्रायलच्या आयर्न डोमने परतवून लावला होता, तसाच हल्ला पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सुदर्शन चक्राने तो फेल ठरविला आहे.2 / 8भारताकडे रशियाची एस ४०० ही एअर डिफेंस सिस्टीम होती. तिने मोठी कामगिरी केलीच परंतू भारताकडे आणखी काही अस्त्रे होती ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये डीआरडीओ, इस्रायल, स्वीडन आणि रशियाच्या अन्य डिफेन्स सिस्टीमचा समावेश आहे. 3 / 8भारताच्या एकात्मिक काउंटर-यूएएस ग्रिड आणि आकाश, एमआरएसएएम, झू-२३, एल-७० आणि शिल्का सारख्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानचा हल्ला निष्प्रभ केला. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट झाली आणि भारताचे नुकसान झाले नाही. 4 / 8आकाश ही भारताने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. डीआरडीओने ती बनविली आहे. लढाऊ विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रांवर ही प्रणाली १८ किलोमीटर पर्यंत मारा करू शकते. आकाशने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने श्रीनगरकडे जाणारे पाकिस्तानी जेएफ-१७ जेट विमान पाडले.5 / 8एमआरएसएएम ही भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे विकसित केलेली एक प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे. यानेही अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले. उत्तर आणि पश्चिम भारतात पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात एमआरएसएएमने महत्त्वाची भूमिका बजावली. ७०-१०० किलोमीटर या प्रणालीने मारा केला. 6 / 8झू-२३-२ ही सोव्हिएत बनावटीची ट्विन-बॅरल २३ मिमी स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे, जी लढाऊ विमानांवर तोफ डागते. यानेही आज महत्वाची कामगिरी केली. 7 / 8शिल्का ही सोव्हिएत-निर्मित स्वयं-चालित विमानविरोधी तोफ आहे. कमी उंचीच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी या तोफेवर आहे. चार चार 23 मिमीच्या तोफा मिनिटाला ४००० या वेगाने डागण्याची क्षमता ठेवते. या सर्व प्रणालींनी एकत्रितपणे काम करत पाकिस्तानचा हल्ला नाकाम ठरविला. 8 / 8एल-७० ही स्वीडिश-निर्मित ४० मिमी विमानविरोधी तोफ असून भारताने ती अपग्रेड केली आहे. ही तोफ प्रति मिनिट ३०० फैरी झाडू शकते. पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्तानी ड्रोन याद्वारेच नष्ट करण्यात आले.