आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:01 IST
1 / 11आपण रेल्वे प्रवासादरम्यान अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणावर सामान वाहून नेताना बघितले असेल. मात्र आता लवकरच यासंदर्भात नियम तयार होणार आहेत. आता रेल्वे विमान प्रवासासा प्रमाणेच सामानासंदर्भात कठोर नियम तयार करणार आहे. 2 / 11या अंतर्गत, विशिष्ट वजन किंवा आकारापेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास आपल्याला दंड भरावा लागू शकतो. यासाठी, रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक मशीन बसवण्यात येतील. जेव्हा यातून सामान जाईल, तेव्हा त्या सामानाचे वजन निर्धारित आहे की नाही ते समजेल. 3 / 11जर सामान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असेल तर, दंड अथवा अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. एवढेच नाही तर, आता रेल्वेस्थानकांवरही लोकांचा अनुभव बदलण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. 4 / 11आता रेल्वे स्थानकांवर मोठ्या ब्रँडची दुकाने दिसू शकतात. रेल्वे स्थानकांवर तुम्हाला कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी सहजपणे खरेदी करता येऊ शकेल. यासाठी, चांगली दुकाने असतील. यासाठी रेल्वेकडून निविदा जारी केल्या जातील. 5 / 11यामुळे, रेल्वे स्थानकांवर पोहोचल्यानंतर लोकांना विमानतळासारखे वातावरण अनुभवायला मिळेल. याशिवाय, रेल्वेचे उत्पन्नही वाढेल. या दुकानांच्या शुल्कातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. अशा दुकानांचे वाटप निविदाद्वारे केले जाईल. 6 / 11लाइव्ह हिंदुस्तानने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सामानाची वजन मर्यादा श्रेणीनुसार ठरवली जाईल. उदाहरणार्थ, जर कुणी सामान्य वर्गाचे तिकीट घेऊन प्रवास करत असेल, तर त्याला 35 किलोपेक्षा अधिक सामान नेण्याची परवानगी नसेल.7 / 11जर एकापेक्षा अधिक लोक प्रवास करत असतील, तर प्रत्येक प्रवाशानुसार निश्चित मर्यादा असेल. जसे की, एका व्यक्तीला 35 किलो सामान सोबत नेण्याची परवानगी असेल, तर दोन लोकांना 70 किलोपर्यंत सामान सोबत नेण्याची परवानगी असेल. 8 / 11आता श्रेणीनिहाय मर्यादेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही मर्यादा स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रति व्यक्ती 40 किलो असेल. सेकंड एसीमध्ये प्रति व्यक्ती 50 किलोपर्यंत असेल, तर पर्स्ट एसीमध्ये ही मर्यादा 70 किलोपर्यंत असेल. 9 / 11रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे की, सर्व प्रवाशांचा प्रवास आनंददायी आणि सुरळीत व्हावा, यासाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.10 / 11आता श्रेणीनिहाय मर्यादेसंदर्भात बोलायचे झाल्यास, बसण्याच्या व्यवस्थेनुसार सामान ठेवता यावे यासाठी हे निश्चित करण्यात आले आहे. जसे की, जनरलमध्ये जागा कमी असते, यामुळे त्यासाठी मर्यादा कमी आहे. याचप्रमाणे स्लीपर आणि थर्ड एसीची बसण्याची व्यवस्था सारखीच असते. यामुळे तेथे सामानाची मर्यादा सारखीच ठेवण्यात आली आहे... 11 / 11...तर सेकंड एसीमध्ये सलग दोनच जागा असतात. यामुळे सामानाची परवानगी थोडी अधिक असेल. या मर्यादेसंदर्भात लवकरच प्रयागराज झोनमध्ये काम सुरू होणार आहे. यानंतर रेल्वेचा हा फॉर्म्युला संपूर्ण देशभरात लागू केला जाईल.