शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीच नव्हे..., देशातील 'या' मोठ्या राज्यांतही काँग्रेसचा एकही आमदार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:55 IST

1 / 11
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला. भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. येथील मतदारांनी दिल्लीतील राजकारणाचे संपूर्ण समिकरण बदलले. मात्र असे असतानाही, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा नाकारले. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा आपले खातेही उघडता आले नाही आणि माथ्यावर 'भोपळा'च राहिला. पण, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 'शून्य' असणारी दिल्ली विधानसभा ही एकमेव विधानसभा नाही.
2 / 11
देशातील किमान ४ राज्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. यात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांचाही समावेश आहे.
3 / 11
आंध्र विधानसभेत 175 जागा, काँग्रेसचा एकही आमदार नाही - आंध्र प्रदेशात 2024 च्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली होती. मात्र पक्षाला एकाही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अधिकांश उमेदवार एकतर तिसऱ्या क्रमांकावर राहिले अथवा त्यांची जमानत जप्त झाली.
4 / 11
आंध्र प्रदेशात एनडीएकडे 164 आमदार आहेत. तर विरोधक वायएसआर यांच्याकडे 11 आमदार आहेत. महत्वाचे म्हणजे, आंध्र प्रदेशात २०१४ पर्यंत काँग्रेस सत्तेवर होती.
5 / 11
पश्चिम बंगाल विधानसभेतही काँग्रेस '०' - पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. येथे मे २०२१ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने येथे डाव्यांसोबत निवडणूक लढवली होती, पण जिंकू शकले नाही. बंगालमध्ये काँग्रेसला पहिल्यांदाच खाते उघडता आले नाही. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. तृणमूलकडे २२४ आमदार तर विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडे ६६ आमदार आहेत.
6 / 11
काँग्रेसने २०२२ मध्ये मुर्शिदाबादमधील सागरदिघीची जागा जिंकली होती. मात्र, आमदार तृणमूलमध्ये गेले. यानंतर, काँग्रेसला आतापर्यंत बंगालमध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही.
7 / 11
सिक्किममध्ये ३२ पैकी काँग्रेसला '०' - सिक्कीममध्ये एकूण ३२ विधानसभा जागा आहेत. कधीकाळी येथे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र, आता सिक्कीममध्ये त्यांच्याकडे एकही जागा नाही. सिक्कीममध्येही काँग्रेस शून्यावर आहे.
8 / 11
सिक्कीममधील सर्व ३२ जागा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या ताब्यात आहेत. एसकेएम येथे भाजपसोबत आहे.
9 / 11
नगालँडमध्येही काँग्रेसच्या माथ्यावर '०' - नागालँडमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये येथे विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस पक्षाला येथे एकही जागा जिंकता आली नाही. नागालँडमध्ये एनडीपीपीचे २५, भाजपचे १२, एनसीपीचे ७, एनपीपीचे ५, एलजेपी (आर)चे २ आणि आरपीआयचे २ आमदार आहेत.
10 / 11
याशिवाय, नागालँडमध्ये एनपीएफचे २ आणि ५ अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे, नागालँडमधील सर्व पक्ष सरकारचा भाग आहेत. येथे कुठलाही विरोधीपक्ष नाही.
11 / 11
याशिवाय, नागालँडमध्ये एनपीएफचे २ आणि ५ अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे, नागालँडमधील सर्व पक्ष सरकारचा भाग आहेत. येथे कुठलाही विरोधीपक्ष नाही.
टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाAndhra Pradeshआंध्र प्रदेशwest bengalपश्चिम बंगालsikkimसिक्किमElectionनिवडणूक 2024