नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:09 IST
1 / 7विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या बिहारमधून मोठी बातमी येत आहे. नितीश कुमारांना सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो असा सर्व्हे आला आहे. 'आयओएन भारत' ने हा सर्व्हे केला आहे. यामध्ये नितीश कुमार यांची सत्ता धोक्यात आल्याचे सांगितले गेले आहे. 2 / 7बिहारमध्ये जातीय समीकरण खूप महत्वाचे आहे. नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणना केली होती. यानंतर लोकसभेला एनडीएत उडी मारून इंडी आघाडीसोबत दगाफटका केला होता. नितीशकुमार यांनीच इंडी आघाडीसाठी पुढाकार घेतला आणि ऐन निवडणुकीत त्यांनी मोदींच्या आघाडीमध्ये उडी मारली होती. सध्या नितीशकुमार मोदी ३.० ला टेकू देऊन आहेत. 3 / 7 जातीय समीकरण जो जुळवेल तो बिहारमध्ये जिंकेल परंतू नितीशकुमारांविरोधात सध्या सत्ताविरोधी वातावरण आहे. याचा फटका एनडीएला बसू शकतो. बिहारमधील ५३४० अत्यंत मागास जातीच्या वॉर्ड नगरसेवकांचे मत यामध्ये नोंदविण्यात आले. नितीश कुमार यांच्याविरुद्ध सत्ताविरोधी लाट असल्याचे यातून दिसले आहे. 4 / 7आयओएन भारत'चे समाजशास्त्रज्ञ रामबंधू वत्स यांनी हा सर्व्हे केला आहे. नितीश कुमार यांच्या सध्याच्या लोकप्रियतेवर आणि सरकारविरुद्धच्या सत्ताविरोधी लाटेवर हे सर्वेक्षण अवलंबून आहे. 5 / 7बेरोजगारी, सरकारची मनमानी, विकासकामांमध्ये दुर्लक्ष, लाचखोरी, कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती, दारूबंदी, वाळू उत्खनन आणि सरकारी निविदांमध्ये पक्षपात, जमीन वाद आदी मुद्द्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 6 / 7यानुसार ६३ टक्के लोक नितीश सरकारच्या कामावर नाराज आहेत, तर १६ टक्के लोक खूश. २१ टक्के लोकांनी माहिती नाही, असे सांगितले आहे. 7 / 7बिहारमध्ये सध्या भूमाफियांची चलती आहे. लोकांच्या जमिनी बनावट कागदपत्रे बनवून घशात घातल्या जात आहेत. तसेच जमिनींवरून वादही वाढले आहेत, याचा फटका सरकारला जास्त बसणार असल्याचे यात म्हटले आहे.