शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nitin Gadkari: नितीन गडकरी थेट गुवाहटीत, माँ कामाख्या देवीचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:44 PM

1 / 10
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि रस्ते बांधणीच्या कामामुळे माध्यमांचे आकर्षण असलेल्या केंद्रीय नितीन गडकरी आज आसाम दौऱ्यावर आहेत. आसाम दौऱ्यात असताना त्यांनी थेट गुवाहटी गाठल्यामुळे ते आता चर्चेत आले आहेत. कारण, गुवाहटी हे गेल्या काहि महिन्यांपासून राज्यात केंद्रस्थानी आहे.
2 / 10
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात बंडखोरी झाल्यानंतर ५० आमदार आसाममधील गुवाहटीतील एका हॉटेलमध्ये राहिले होते. या हॉटेलमधील त्यांचे व्हिडिओ, संवाद आणि घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.
3 / 10
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा ऑडिओ कॉल रेकॉर्डींगही तुफान व्हायरल झालं होतं. त्यामध्ये, गुवाहटीचं वर्णन करताना त्यांनी, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... असं म्हणत महाराष्ट्राला याड लावलं होतं.
4 / 10
शहाजी पाटलांच्या या डॉयलॉगची क्रेझ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. अगदी घराघरात लहान मुलेही काय झाडी, काय डोंगार, म्हणू लागली होती. त्यामुळे, गुवाहटी चर्चेचा विषय बनलं.
5 / 10
सुरतमार्गे गुवाहटीला गेलेले आमदार थेट गोवामार्गे मुंबईत परतले. विशेष म्हणजे मुंबईत येताच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अन् भाजपसोबत सरकार स्थापन केले. तत्पूर्वी ५० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.
6 / 10
एकनाथ शिंदेंनी विधानसभेत भाषण करताना कामाख्या देवीचा उल्लेख केला. तर, संजय राऊत यांनी ४० रेड्यांचा कामाख्या देवीपुढे बळी देणार असल्याची भाषा केली होती. त्यामुळे, कामाख्या देवीचं जागृत देवस्थान महाराष्ट्रातही चर्तेत आलं होतं.
7 / 10
आता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आसाम दौऱ्यावर असताना कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यांनंतर, त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची भेट घेतली. बिस्वा यांनी गडकरींचं स्वागतही केलं.
8 / 10
गडकरी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन गुवाहटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, माँ कामाख्या देवीची पूजा करुन देशाच्या प्रगतीसाठी मनोकामना केल्याचंही गडकरींनी म्हटलं.
9 / 10
गडकरी यांच्यासमवेत गुवाहटी दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग हेही कामाख्या देवीच्या दर्शनाला होते.
10 / 10
दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नितीन गडकरी यांनी मंगळवारी कौतुक केले. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली, असे त्यांनी म्हटल्याने ते चर्चेत आले आहेत.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीguwahati-pcगौहतीAssamआसामministerमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे