शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 22:11 IST

1 / 6
Mahakumbh 2025 : त्रिवेणी संगमावर वसलेल्या प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील साधू-सतांमसह कोट्यवधी भाविक महाकुंभात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, निरंजनी आखाड्यातील साधूंसोबत दिसलेल्या साध्वी हर्षा रिचारिया, यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यांच्याशिवाय, ॲपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स, यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्सदेखील महाकुंभात कल्पवास करत आहेत.
2 / 6
निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांच्या शिबिरात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या या कल्पवासामुळे निरंजनी आखाड्याची देशासह जगात खूप चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, केवळ लॉरेन पॉवेलच नाही, तर देश-विदेशातील अनेक दिग्गज या आखाड्याशी संबंधित आहेत आणि या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या सेलिब्रिटींमध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, क्रिकेटर सुरेश रैना, प्रवीण यादव, ऋषभ पंत, गायक हनी सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आदींचा समावेश आहे.
3 / 6
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही निरंजनी आखाड्यात हजेरी लावतात. अखिलेश यादव यांचे वडील आणि दिवंगत राजकारणी मुलायम सिंह यादव आणि सपा नेते अमर सिंह यांचाही या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांच्याशी घट्ट स्नेह होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आखाड्याला अनेकदा हजेरी लावली आहे.
4 / 6
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती याही या आखाड्याच्या संत आहेत. तर, थॉमस मेरिट नाल्स यांचे पुत्र व्यासानंद गिरी, जे अमेरिकन हवाई दलात उपसंचालक ऑपरेशन्स होते, हेदेखील या आखाड्याचे संत असून, रविवारीच महाकुंभाच्या वेळी त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली होती. त्यांनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांच्याकडून 12 वर्षांपूर्वी कुंभातच दीक्षा घेतली होती आणि घर सोडून सनातनच्या प्रचारात रमले होते.
5 / 6
सनातन परंपरेत एकूण 13 आखाडे असून, या आखाड्यांमध्ये विलक्षण प्रतिभा असलेले ऋषी-मुनी आहेत. मात्र, निरंजनी आखाडा अनेक बाबतीत थोडी वेगळा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, या आखाड्यातील सुमारे 80 टक्के संत हे उच्च शिक्षित आणि वेद-पुराणात पारंगत आहेत.
6 / 6
या आखाड्यात मोठ्या संख्येने प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, आयएएस आणि आयपीएस आहेत. एकदा लोक आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांना स्वतः भेटले की, ते त्यांचे भक्त बनतात. निरंजनी आखाड्याचे संत भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेयला पुजतात.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशMukesh Ambaniमुकेश अंबानीKangana Ranautकंगना राणौतHoney Singhहनी सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ