शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

करूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 9:19 PM

1 / 8
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
2 / 8
एम. करुणानिधी यांनी मुख्यमंत्री या नात्याने तामिळनाडू राज्याची धुरा पाचवेळा सांभाळली आहे. सलग 50 वर्षे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
3 / 8
स्वातंत्र्यानंतर द्राविडार कळघम पक्षामध्ये फूट पडली. करुणानिधी यांनी त्यांचे राजकीय गुरु अण्णादुराई यांच्याबरोबरच राहाण्याचा निर्णय घेतला. 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोशाध्यक्ष झाले.
4 / 8
1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते.
5 / 8
1977 साली एम. जी. रामचंद्रन म्हणजे एमजीआर त्यांच्या पक्षातून बाहेर पडले व अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष सत्तेत आला. 1987 पर्यंत एमजीआर सत्तेत राहिले.1987 साली एमजीआर यांचे निधन झाल्यावर दोन वर्षांमध्येच करुणानिधी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
6 / 8
राजकारणासह चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
7 / 8
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत करुणानिधींनी कुलीतलाई, तंजावर, सैदापेट, अण्णानगर, हार्बर, चेपॉक, तिरुवरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली.
8 / 8
वयाच्या 14 व्या वर्षापासून करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर आयुष्याचा पुढील सर्व काळ त्यांनी याच क्षेत्रात व्यतीत केला.
टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू