शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mamata Banerjee for PM: पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जी उभ्या ठाकल्या तर...मोदींचे काय; लोकांच्या मनात कोण? सर्व्हे आला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 9:50 AM

1 / 9
वाढलेली महागाई, इंधन दरांमुळे केंद्र सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. लोकांमध्ये रोष आहे, राज्य सरकारांना चांगले रेटिंग मिळाले आहे. परंतू लोकांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचा जोश कमी झालाय का? गुडघ्याला बाशिंग बांधून पंतप्रधान पदाची तयारी करणाऱ्या ममता बॅनर्जी देशाच्या पंतप्रधान होणार का? याबाबत IANS C Voter Survey केला आहे. यामध्ये प. बंगालमध्ये धक्कादायक कौल समोर येत आहे.
2 / 9
सी व्होटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसेच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये हा विशेष सर्व्हे करण्यात आला. या राज्यांमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक महागाईमुळे त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
3 / 9
तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ काही कमी झालेली दिसली नाही. या चारही राज्यांत मोदींनाच पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती आहे. काँग्रेसचे राहुल गांधी, आपचे अरविंद केजरीवाल आणि तृणमूलच्या ममता बॅनर्जी या मोदींच्या आसपासही असल्याचे दिसले नाही. धक्कादायक बाब म्हणजे ममता बॅनर्जींना त्यांचेच राज्य प. बंगालमध्ये देखील सर्वाधिक पसंती मिळालेली नाही.
4 / 9
या चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेच्या १२० जागा आहेत. ज्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यासाठी कमी नाहीत. तामिळनाडू आणि केरळमध्ये राहुल गांधींना दिलासा देणारी बाब आहे. पाँडिचेरी, बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढत आहे. तर तामिळनाडूमध्ये काँग्रेस मित्रपक्षासोबत सत्तेत आहे, केरळमध्ये विरोधक आहे.
5 / 9
पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक चांगला उमेदवार कोण असा प्रश्न सर्व्हेमधील लोकांना विचारण्यात आला. यामध्ये आसामच्या ४३ टक्के लोकांना मोदींचे नाव घेतले. यानंतर केजरीवाल यांना ११ टक्के, राहुल गांधी यांना १०.७ टक्के लोकांना पाठिंबा दिला.
6 / 9
ज्या केरळमधून राहुल गांधी लढले तिथे मोदींना २८ टक्के लोकांनी पाठिंबा दिला. यानंतर राहुल गांधींना 20.38 टक्के लोकांनी पहिली पसंद असल्याचे म्हटले. केजरीवाल यांना 8.28 लोकांना पाठिंबा दिला.
7 / 9
तामिळनाडू हे काही ममतांचे राज्य नाही. ते मोदींचेही राज्य नाही. तरीही मोदींना 29.56 टक्के लोकांना पाठिंबा दिला. राहुल गांधींना 24.65 टक्के लोकांची पसंती आहे. ममतांना 5.23 लोकांचे समर्थन मिळाले असून त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
8 / 9
आता तीन राज्ये सोडा, ममता ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, ज्या राज्यात त्यांनी प्रचंड बहुमताने सत्ता राखली त्या राज्यात पंतप्रधान म्हणून ममतांना मोदींच्या जवळपास निम्मे समर्थन आहे. मोदींना 42.37 टक्के लोकांनी पसंती दिली. तर 26.08 टक्के प. बंगालची जनता ममतांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छिते. राहुल गांधींना १४.४ टक्के लोकांचा सपोर्ट मिळाला.
9 / 9
पाँडिचेरीमध्ये 49.69 टक्के लोकांनी मोदींना पहिली पसंती दिली. 11.8 टक्के लोकांना काँग्रेसला आणि ३.२ टक्के लोकांनी राहुल गांधींना पसंती दिली. या पाचही ठिकाणची सरासरी काढली तर मोदी ३९ टक्के, राहुल गांधी १०.१, केजरीवाल 7.62 आणि ममतांना 3.23 टक्के लोकांची पसंती आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल