शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 4:07 PM

1 / 11
भारतात अनेक अशी गावे आहेत जिथे काही ना काही पौराणिक रहस्य लपलेले आहेत. असेच एक भारताचे शेवटचे गाव जे उत्तराखंडमध्ये आहे. या गावाला खरोखरच 'भारताचे शेवटचे गाव' म्हटले जाते. हे गाव पवित्र बद्रिनाथपासून चार किमी लांब आहे. हे गाव चीनच्या सीमेला लागूनच आहे.
2 / 11
पौराणिक कथांनुसार हे भारतातील एकमात्र असे गाव आहे, जे चारही धामांपेक्षाही पवित्र आहे. या गावाला शापमुक्त आणि पापमुक्त असल्याचे मानले जाते.
3 / 11
या गावाचे आणखी एक महत्व म्हणजे याचे नाते महाभारत काळाशी आणि आराध्य दैवत गणपती सोबतही जोडलेले आहे. या गावातूनच पांडव स्वर्गात गेले होते, अशी आख्यायिका आहे. या गावाशी जोडलेली अशी अनेक रहस्यमयी आणि रोचक गोष्टी आहेत, ज्या हैरान करणाऱ्या आहेत.
4 / 11
या गावाबाबत आणखी एक मोठी आख्यायिका आहे की, या गावात येऊन जाणाऱ्या व्यक्तीची गरीबी दूर होते. या गावाला महादेव शंकराचा आशिर्वाद मिळालेला आहे की, जो कोणी या गावात येईल त्याची गरीबी दूर होईल. यामुळे मोठ्या संख्येने लोक या गावात फिरण्यासाठी येतात.
5 / 11
या रहस्यमयी गावाचे नाव आहे माणा. हे गाव समुद्रसपाटीपासून जवळपास १९ हजार फूट उंचीवर वसलेले आहे.
6 / 11
या गावाचा संबंध गणपतीशीही जोडलेला आहे. महर्षी वेदव्यास यांच्या सांगण्यावरून जेव्हा गणपती महाभारत लिहित होते, तेव्हा सरस्वती नदीच्या प्रवाहाचा आवाज मोठ्याने येत होता. तेव्हा त्यांनी सरस्वतीला पाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. तरीही आवाज कमी न झाल्याने गणपतीने नदीला शाप दिला होता. आजपासून तू कोणालाच दिसणार नाही, असा शाप होता.
7 / 11
या गावाचे नाव मणिभद्र देवाच्या नावावरून माणा पडल्याचे सांगितले जाते.
8 / 11
या गावामध्ये व्यास गुहादेखील आहे. यामध्ये वेदव्यास राहत असल्याचे सांगितले जाते. याच जागेवर त्यांनी अनेक वेद आणि पुराणांची निर्मिती केली होती.
9 / 11
या गावामध्ये महाभारत काळातील बनलेले एक पूल आजही आहे. ज्याला भीम पूल म्हणून ओळखले जातो.
10 / 11
पांडव जेव्हा स्वर्गात जात होते, तेव्हा सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी मार्ग मागितला होता. मात्र, या नदीने हा मार्ग देण्यास नकार दिला. यामुळे भीमाने दोन मोठाले दगड या नदीच्या प्रवाहावर ठेवले आणि रस्ता बनविला. या पुलावरूनच पांडव पुढे स्वर्गात गेल्याचे सांगितले जाते.
11 / 11
ही गुहा पाहून असे वाटते की, ग्रंथांच्या पानांना एकावर एक असे ठेवले आहे. यामुळे या गुहेला व्यास पोथी असेही म्हटले जाते.
टॅग्स :Pandav cavesपांडवलेणीMahabharatमहाभारतganpatiगणपती