देशातल्या रेल्वे स्टेशनांची 'ही' नावं वाचून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 03:56 PM2018-04-12T15:56:15+5:302018-04-12T16:05:31+5:30

बाप नावाचे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे. जोधपूर जवळ हे स्टेशन असून दररोज दोन एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात

तेलंगानातील भुवानागिरी जिल्ह्यात बीबीनगर रेल्वे स्टेशन आहे.

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात बिल्ली नावाचे रेल्वे स्टेशन आहे.

ओढनिया चाचा हे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्येच आहे. समुद्रापासून 224 मीटर उंचीवर आहे.

हरियाणातील पानीपत जिल्ह्यामध्ये दिवाना नावाचे रेल्वे स्टेशन आहे.

जालंधरमध्ये काला बकरा नावाचे रेल्वे स्टेशन आहे. हे ठिकाण गुरबचन सिंह यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. गुरबचन सिंह यांना इंग्रजांच्या काळात सन्मानित केलं होते.

नाना रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे. सिरोही पिंडवाडा या जागेवर हे स्टेशन नव्याने बनवले आहे. नाना रेल्वे स्टेशन उदयपूर जवळ आहे.

साली रेल्वे स्टेशन हे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात आहे.