1 / 7जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी बुधवारी संध्याकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.2 / 7कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट दिसून आली. 3 / 7काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डावे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, शरद यादव हे नेते या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. 4 / 7शपथविधीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मायावती आणि सोनिया गांधी यांनी एकमेकींची गळाभेट घेतली.5 / 7यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उपस्थित होते. 6 / 7समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांची गळाभेट घेत आशीर्वाद घेतले. 7 / 7अखिलेश यादव आणि मायावती उपस्थितांना अभिवादन करताना.