शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Model Tenancy Act: दोन महिन्यांचे भाडे थकले तर...; जाणून घ्या घरमालकाला कोणते मिळणार अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 12:32 PM

1 / 10
मोदी सरकारने मॉडेल टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) मसुद्याला परवानगी दिली आहे. आदर्श भाडेकरार कायद्याचा हा मसुदा आता राज्यांना पाठविला जाणार आहे. यानंतर यामध्ये सुचविलेले बदल करून तो देशभर लागू केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजुरी दिली आहे. (New Model Tenancy Act, what about tenants not gave rent for two months. )
2 / 10
या नव्या कायद्यानुसार टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) घर मालक आणि भाडेकरुमधील मतभेद कमी केले जाणार आहेत. तसेच अनेक रिकामी घरे आता भाड्याने देता याणार आहेत. यामुळे घरांची कमतरता दूर होणार आहे. बिझनेसही वाढीस लागणार आहे.
3 / 10
नव्या Model Tenancy Act मध्ये जर भाडेकरूने दोन महिने भाडे दिले नाही कर घरमालक त्याच्याकडून घर खाली करून घेऊ शकतो. (New Model Tenancy Act oweners Rights)
4 / 10
Model Tenancy Act नुसार जर मालकाला घर दुरुस्ती किंवा पाहणी करयाची असेल किंवा अन्य कोणत्याही उद्देशाने यायचे असेल तर 24 तास आधी लिखित नोटीस भाडेकरूला द्यावी लागणार आहे. (before 24 hours notice)
5 / 10
रेंट अॅग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या वेळेआधी भाडेकरूला काढण्यासाठी दोन अटी आहेत. एकतर भाडेकरूने दोन महिन्यांचे भाडे थकविले असेल किंवा तो घराचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल, तरच त्याला मुदत संपण्याआधी घरातून बाहेर काढता येणार आहे.
6 / 10
भाड्याने घर घेताना सिक्युरिटी डिपॉझिटवरून देखील वाद होतो. नव्या कायद्यानुसार घरासाठी अधिकाधिक दोन महिन्यांचे भाडे अनामत रक्कम म्हणून घ्यावे लागणार आहे. तर नॉन रेसिडेंशियल म्हणजेच दुकाने, वेअरहाऊस किंवा अन्य जागांसाठी सहा महिन्यांचे भाडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेता येणार आहे.
7 / 10
घर किंवा दुकान रिकामे करण्यासाठी मालकाने भाडे करारातील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, तरीदेखील भाडेकरू ते खाली करत नसेल तर मालक दोन महिन्यांसाठी दुप्पट भाडे वसूल करू शकतो.
8 / 10
दोन महिन्यांनी देखील रिकामे केले नाही, तर पुढील दोन महिने चौपट भाडे करू शकतो. यासाठी मालकाला जागा खाली करण्यास सांगण्याआधी नोटीस देणे बंधनकारक आहे. नोटीस दिल्यानंतर लिखित किंवा मेल, मेसेजद्वारे एक दिवसानंतर भाडेकरूला याची कल्पना द्यावी.
9 / 10
भाडेकरू कोणत्याही मालमत्तेवर कब्जा करू शकत नाही. घर मालकही भाडेकरूला त्रास देऊन घर खाली करून घेऊ शकत नाही. यासाठी गरजेचे नियम बनविण्यात आले आहेत. भाडेकरू ज्या मालमत्तेमध्ये राहत आहे, त्याला त्या मालमत्तेची देखभाल करावी लागणार आहे.
10 / 10
घरमालक आणि भाडेकरूमध्ये जर काही वाद झाला तर त्याची सुनावणी रेंट अथॉरिटी (Rent Authority) मध्ये होईल. महत्वाचे म्हणजे रेंट अॅग्रीमेंट हे घरमालकाने आणि भाडेकरूने स्वत: हजर राहून रेंट अथॉरिटीसमोर बनवावे लागणार आहे. जर ते शक्य नसेल तर रेंट अॅग्रीमेंट बनविल्याच्या दोन महिन्यांत रेंट अथॉरिटीला याची प्रत आणि माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी रेंट अथॉरिटी बनविली जाणार आहे.
टॅग्स :HomeघरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी