म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोण आहेत 'ते' ७ गेमर्स! ज्यांचे लाखो फॉलोअर्स; खुद्द PM नरेंद्र मोदीही भेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:08 IST
1 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑनलाईन गेमर्सची भेट घेतली. हे ते युवक आहेत, जे ई स्पोर्टस इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमन माथुर, अनिमेश अग्रवाल, मिथिलेश पाटणकर, पायल धारे, अंशु बिष्ट, तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधर यांच्याशी संवाद साधला2 / 9या सर्वांना भेटून पंतप्रधान मोदींनी गेमिंग इंडस्ट्रीत येणारी नवी आव्हाने आणि त्यावर उपाय यासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीचा एक टिझरही रिलीज करण्यात आला आहे. १३ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या गेमर्समधील चर्चेचा पूर्ण व्हिडिओ प्रसारित केला जाईल. हे गेमर्स नक्की कोण आहेत त्याबाबत जाणून घेऊया.3 / 9अनिमेश अग्रवाल - अनिमेशनं मोदींसोबत भेटीनंतर इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आम्ही ई स्पोर्टसबाबत मोदींसोबत चर्चा केल्याचं म्हटलं. लवकरच याचा व्हिडिओ समोर येईल. अनिमेश 8bit_thug नावानं सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. त्याच्या युट्यूब सब्स्क्राईबर्सची संख्या १ मिलियन इतकी आहे. तर इन्स्टावर ८७ लाख लोक त्याला फॉलो करतात. 4 / 9नमन माथूर - नमननेही मोदींसोबतचा त्याचा फोटो शेअर केला. नमनचे इन्स्टाग्रामवर ५३ लाख फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर त्याच्या सब्स्क्राईबर्सची संख्या ७० लाख इतकी आहे. 5 / 9मिथिलेश पाटणकर - मिथिलेश सोशल मीडियावर mythpat नावाने ओळखला जातो. त्याची इन्स्टा फॉलोअर्स संख्या ३४ लाख आहे. त्याने आतापर्यंत ३२४ पोस्ट शेअर्स केल्यात. तर युट्यूबवर त्यांच्या सब्स्क्राईबर्सची संख्या १ कोटी ४६ लाख इतकी आहे. त्याशिवाय Intel Gaming चा तो ब्रँड एंबेसिडर आहे. 6 / 9पायल धारे - पंतप्रधान मोदींनी भेटणारी ही एकमेव महिला गेमर आहे. मोदींच्या भेटीनंतर तिने सोशल मीडियावर फोटो अपलोड केला. इन्स्टाग्रामवर पायलच्या फॉलोअर्सची संख्या ३१ लाख आहे तर तिच्या YouTube चॅनेलचे सब्स्क्राईबर्स ३६.९ लाख इतके आहेत. 7 / 9अंशु बिष्ट - अंशुनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सोशल मीडियात पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या १७ लाख इतकी आहे. त्याने २९९ पोस्ट केल्यात. तर युट्यूबवर त्याचे ३८.९ लाख इतके सब्स्क्राईबर्स आहेत. 8 / 9गणेश गंगाधर - ई गेमर्समधील गणेश गंगाधरच्या सोशल मीडियावर १ मिलियनपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ५७ हजार तर युट्यूब चॅनेलवर १ कोटी ५८ लाख इतके सब्स्क्राईबर्स आहेत. मोदींच्या भेटीनंतर त्यानेही सोशल मीडियात फोटो शेअर केला.9 / 9 तीर्थ मेहता - ऑनलाईन गेमर्स यादीतील अखेरचं नाव तीर्थ मेहता, २०१८ मध्ये ई स्पोर्टस एशियन खेळात हार्थ स्टोनमध्ये तीर्थनं ब्रॉंझ मेडेल पटकावलं होते. मोदींच्या भेटीनंतर त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत ई गेमिंगाबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा केल्याचं सांगितले.