शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lok Sabha Election 2019 : पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:30 PM

1 / 8
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत.
2 / 8
17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.
3 / 8
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे मतदान केंद्र नेमके कोणते आहे, हे पाहू शकता. तिथे सीईओ, डीईओ, ईआरओ आणि बीएलओंना संपर्क करण्यासाठी त्यांचे फोन नंबर मिळू शकतात. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्येही मतदान केंद्राची माहिती मिळू शकते.
4 / 8
मतदान केंद्रावर गेल्यानंतर केंद्राबाहेर तुम्हाला विविध पक्षांचे वेगवेगळे डेस्क आढळतील. कोणत्याही डेस्कवर तुम्ही तुमचे मतदार यादीतील नाव तपासू शकता. नाव पाहिल्यानंतर आत जा आणि रांगेत उभे राहा.
5 / 8
तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव सांगा. त्यानंतर तेथील कर्मचारी तुमच्या बोटाला शाई लावेल.
6 / 8
मतदानाच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तेथे ईव्हीएम दिसेल. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबा.
7 / 8
बटन दाबल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. व्हीव्हीपॅटची वाट पाहा. व्हीव्हीपॅटमधून आलेली स्लीप पाहा. तुमचे मत योग्य उमेदवाराला गेले का, याची खात्री करा.
8 / 8
निवडणूक आयोगाने दिलेली मतदार स्लीप घेऊन मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. जर मतदार स्लीप मिळालेली नसेल, तर तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा मग सरकारने वितरित केलेले इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नेऊ शकता.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान