शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:59 IST

1 / 12
Ayodhya Ram Mandir Donation: श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत रामललाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ तसाच कायम आहे. ०२४ मध्ये अयोध्येत पोहोचलेल्या १६ कोटी भाविकांचा विक्रम केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक आकडा आहे.
2 / 12
नवीन भव्य श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत केवळ भाविकांचा ओघ वाढला नाही तर शहराच्या अर्थव्यवस्थेने आणि पर्यटन पायाभूत सुविधांनीही नवीन विक्रम प्रस्थापित केले. अयोध्येतील राम मंदिराला पैशांच्या स्वरुपात आणि सोने-चांदी स्वरुपात दान करणाऱ्या भाविकांची यादी हजारोंच्या घरात आहे.
3 / 12
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. मुंबईतील एका उद्योजकाने राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
4 / 12
देशभरातून आणि जगभरातून हजारो भाविक दररोज रामनगरीला दर्शनासाठी येतात. आपल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात अनेक तास रांगेत उभे राहणारे भाविक भरघोस देणगी देत आहेत. राम भक्त सढळ हस्ते दान देताना पाहायला मिळत आहेत.
5 / 12
गेल्या वर्षभरात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ₹३२७ कोटींची कमाई केली. यापैकी ₹१५३ कोटी रुपये भाविकांनी दिलेल्या दानातून प्राप्त झाले आहेत. तर १७३ कोटी रुपये या देणग्यांवर व्याज म्हणून मिळाले होते.
6 / 12
एका आकडेवारीनुसार, दररोज ७० ते ८० हजार भाविक अयोध्येत येतात. ते राम मंदिर, हनुमानगढी आणि इतर मंदिरांना भेट देतात. पूजा-पाठ करतात. अयोध्येत येणारे भक्तगण पैशांव्यतिरिक्त सोने आणि चांदीही दान करतात. विविध प्रकारचे सोने-चांदीचे दागिने अर्पण करतात.
7 / 12
गेल्या वर्षी, ट्रस्टने विविध स्रोतांमधून ₹३२७ कोटी कमावले. गेल्या पाच महिन्यांत, १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीत, एकूण उत्पन्न ₹१०४.९६ कोटी होते.
8 / 12
देणगी काउंटरद्वारे एकूण ₹६.२० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, तर ऑनलाइन देणग्यांद्वारे एकूण ₹२०.८६ कोटी रुपयांच्या देणग्या राम मंदिराला प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
9 / 12
दरम्यान, भव्य राम मंदिराचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हे काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.
10 / 12
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखराचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. तर या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत इतर उर्वरित बांधकाम, तटबंदी आणि इतर संरचनांचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
11 / 12
रामललाच्या प्रमुख मंदिरासह श्रीरामांचा दरबार, सूर्य, अन्नपूर्णा आणि हनुमान यांना समर्पित मंदिरे अयोध्येतील राम मंदिर संकुलात बांधली जाणार आहेत. राम मंदिराभोवती एक आयताकृती भिंत बांधली जात आहे, ज्याचे अंदाजे २० टक्के काम शिल्लक आहे.
12 / 12
अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला २०२४-२५ मध्ये विविध स्त्रोतांकडून ३१६.५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या काळात श्रीराम मंदिर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम कामावर सर्वाधिक ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशspiritualअध्यात्मिक