1 / 10लडाखच्या तरतुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या ७ जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. जखमींवर योग्य उपचार आणि काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू असून, याअंतर्गत गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.2 / 10गंभीर जखमी असलेल्या जवानांना भारतीय वायुसेनाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या गाडीचा अपघात झाला त्यात 26 जवान प्रवास करीत होते. रस्ते अपघातात भारतीय सैन्याची गाडी श्योक नदीत कोसळली.3 / 10यापैकी 19 जखमी जवानांना C17 मार्फत चंदीगडमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेचा तपास करण्यात येत आहे.4 / 10सैन्याने सैनिकांना नेण्यासाठी हे खाजगी वाहन भाड्याने घेतले होते. हे वाहन रस्त्यावरून घसरले आणि खोल दरीत पडले, असे नुब्रा पोलिस स्टेशनचे एसएचओ स्टॅनझिन दोरजे म्हणाले.5 / 10आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ज्यामध्ये सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले.6 / 10जखमी जवानांना परिसरातील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रथमदृष्ट्या हा अपघात चालकाच्या निष्काळजीमुळे झाल्याचे दिसत आहे, असेही दोरजे म्हणाले. 7 / 10आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत. गंभीर जखमींना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे. यामध्ये हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे.8 / 10थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला.9 / 10लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले. 10 / 10सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली.