पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:07 IST
1 / 8मूड ऑफ द नेशनने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेची पसंती मिळाली आहे. मात्र, ऑगस्टत 2025 मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पंतप्रधानांचे परफॉर्मन्स रेटिंग किंचितसे कमी झाल्याचे दिसत आहे. 2 / 8यापूर्वी, फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 62 टक्के लोकांनी त्यांचे काम चांगले असल्याचे म्हटले होते, तर यावेळी 58 टक्के लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.3 / 8पंतप्रधान मोदींचा परफॉर्मन्स रेटिंग काहीसा घसरला असला तरी, हे आकडे ११ वर्षांच्या कार्यकाळानंतरही मोदींची जनतेतील स्वीकृती दर्शवतात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३४.२ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील कामगिरीचे 'आउटस्टँडिंग' म्हणत कौतुक केले आहे...4 / 8...याशिवाय,२३.८ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले आहे. तसेच, फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या MOTN सर्वेक्षणात, ३६.१ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीची आउटस्टँडिंग अथवा उत्कृष्ट असल्याचे म्हटले होते. यात, यावेळी काहीशी घसरण झाल्याचे दिसत आहे.5 / 8किती टक्के लोक पंतप्रधान मोदींच्या कामावर नाराज - दरम्यान, १२.७ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी सरासरी असल्याचे म्हटे आहे. तर १२.६ टक्के आणि १३.८ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी प्रत्येकी 'वाईट' आणि 'फारच वाईट' असल्याचे म्हटले आहे.6 / 8एनडीए सरकारच्या कामगिरीसंदर्भात काय म्हणतायेत लोक - सर्वेक्षणानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये ६२.१ टक्के लोकांनी एनडीए सरकारची कामगिरी 'चांगली' असल्याचे म्हटले होते. मात्र या नवीन सर्वेक्षणात हा आकडा ५२.४ टक्क्यांवर आला आहे. 7 / 8याशिवाय, १५.३ टक्के लोक ना समाधानी आहेत, ना असमाधानी. हा आकडा फेब्रुवारी महिन्यातील ८.६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच, आकडेवारीनुसार, २.७ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले असून हा आकडा जवळजवळ सहा महिन्यांपूर्वीसारखाच राहिला आहे.8 / 8इंडिया टुडे-सी व्होटरचे हे मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षण 1 जुलै पासून 14 ऑगस्ट, 2025 दरम्यान करण्यात आले होते. यात सर्व लोकसभा मतदारसंघातील 54,788 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. सी व्होटरच्या ट्रॅकर डेटावरून 152038 अतिरिक्त मुलाखतीचे विश्लेषणही करण्यात आले. या MOTN रिपोर्ट साठी एकूण 206826 लोकांचे मत जाणून घेण्यात आले.