शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:36 IST

1 / 12
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या पवित्र्यात असलेल्या भारतीय नौदलाला आज अत्याधुनिक, शक्तीशाली युद्धनौका मिळणार आहे. ही युद्धनौका ब्रम्होस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल डागणारी आहे.
2 / 12
या युद्धनौकेवर हवेत मारा करू शकणारी मिसाईल आहेत. तसेच १०० मिमी गन, शक्तीशाली टॉर्पिडो जे शत्रूच्या युद्धनौका, पाणबुड्यांना भेदू शकतील, तसेच त्वरीत हल्ल्यासाठी अँटी सबमरीन रॉकेट या युद्धनौकेवर असणार आहेत.
3 / 12
या युद्धनौकेवरील गन एक मिनिटाला ५००० गोळ्या झाडू शकते, एवढी शक्तीशाली आहे. एवढेच नाही तर ही युद्धनौका ३० नॉट्सच्या वेगाने आणि समुद्रात लांबपर्यंत जाऊ शकते.
4 / 12
१ जुलै हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे. रशियातील कॅलिनिनग्राडमध्ये रडार टाळण्यास सक्षम एक विनाशक आणि एक स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका मिळणार आहे. आयएनएस तमाल असे या युद्धनौकेचे नाव असून नावावरून इंद्राची तलवार असे तिला ओळखले जाणार आहे.
5 / 12
२०१६ मध्ये भारताने रशियासोबत २१ हजार कोटींचा करार केला होता. यानुसार भारतीय नौदलाला क्रिवाक - ३ क्लासचे ४ फ्रिगेट मिळणार आहेत. यापैकी दोन म्हणजेच आयएनएस तुषिल आणि आयएनएस तमाल हे रशियात तयार झाले आहेत. यांची किंमत ८००० कोटी आहे. तुषिल डिसेंबर २०२४ मध्येच भारताला मिळाली आहे.
6 / 12
उर्वरित आयएनएस त्रिपुट आणि तवस्या रशियाच्या मदतीने गोव्यातील शिपयार्डमध्ये बांधण्यात येत आहेत. याचा खर्च १३ हजार कोटी रुपये आहे. २०२६ पर्यंत त्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात असतील.
7 / 12
गेल्या दोन दशकांत रशियाकडून मिळालेल्या क्रिव्हक श्रेणीतील फ्रिगेटच्या मालिकेतील आयएनएस तमाल ही आठवी प्राणघातक युद्धनौका आहे. तमालवरील त्यातील २६ टक्के उपकरणे स्वदेशी आहेत.
8 / 12
इंद्राने युद्धासाठी वापरलेल्या पौराणिक तलवारीचे नाव तमाल आहे. जहाजाचा शुभंकर अमर अस्वल राजा 'जांबुवंत' आणि रशियन राष्ट्रीय प्राणी युरेशियन तपकिरी अस्वल यांच्या समानतेने प्रेरित आहे.
9 / 12
तमाल युद्धनौका १२५ मीटर लांब आहे आणि वजन ३९०० टन आहे. या युद्धनौकेवर हेलिकॉप्टरही ठेवले जाऊ शकते.
10 / 12
युद्धनौकेत २५० हून अधिक नौदल कर्मचारी आहेत, जे फेब्रुवारीमध्येच रशियाला गेले होते. तीन महिने या युद्धनौकेचा सराव घेण्यात आला आहे. तमालने समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. ही युद्धनौका पाकिस्तानवर जरब बसविण्यासाठी पश्चिमी कमांडवर तैनात असणार आहे.
11 / 12
सध्या नौदलासाठी ५९ युद्धनौका आणि जहाज बनविले जात आहेत. मेक इन इंडियाअंतर्गत ते भारतातच बनणार आहेत. याचबरोबर आणखी ३१ युद्धनौका बनविण्याची निविदा निघाली आहे.
12 / 12
भारतीय नौदलाकडे सध्या १४० युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. तसेच विमानवाहू युद्धनौकांवर २५० हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत. २०३० पर्यंत विमानांची संख्या ३५० आणि युद्धनौकांची संख्या १८० करण्याची तयारी सुरु आहे.
टॅग्स :indian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तानrussiaरशियाwar shipयुद्ध नौका