शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 4:27 PM

1 / 8
भारतीय हवाई दलाने ८ ऑक्टोबर रोजी आपला ९१ वा स्थापना दिवस साजरा केला. या निमित्ताने भारतीय हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
2 / 8
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
3 / 8
भारतीय हवाई दलानेच्या ध्वजात तब्बल ७२ वर्षांनंतर बदल झाला आहे. स्वातंत्र्यानंतर हवाई दलाचा पहिला ध्वज १९५१ मध्ये तयार करण्यात आला होता.
4 / 8
नवीन ध्वज निळ्या रंगाचा आहे आणि वरच्या डाव्या कोपऱ्यात तिरंगा आहे, तर हवाई दलाचे वर्तुळाकार चिन्ह तळाशी उजव्या कोपऱ्यात आहे.
5 / 8
याचबरोबर, नवीन ध्वजावर राष्ट्रचिन्ह असलेला अशोक स्तंभ आणि हवाई दलाच्या गोलाकार चिन्हाच्या वर देवनागरीमध्ये सत्यमेव जयते लिहिलेले आहे. तसेच, पंख पसरलेले हिमालयन गरुड आहे, जे हवाई दलाची ताकद दाखवते.
6 / 8
दरम्यान, भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना झाली. भारतीय हवाई दल दरवर्षी हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा करते.
7 / 8
यानिमित्त प्रयागराजमधील बमरौली एअरफोर्स स्टेशनवर मेगा एअर शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची थीम ‘IAF– Airpower Beyond Boundaries' आहे.
8 / 8
तसेच, यावेळी दलाच्या ताफ्यातील अनेक लढाऊ विमानांची उड्डाणे करून जवानांनी आपली ताकद दाखवून दिली. याशिवाय परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीनेही सहभाग घेतला. एवढेच नाही तर यावेळी या परेडची कमान महिला अधिकारी ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांच्याकडे होती.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल