1 / 9पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. भारताने पाकविरोधात कठोर पाऊल उचलल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. पाकचे काही मंत्री भारताविरोधात गरळ ओकत अणुहल्ल्याची पोकळ धमकी देत आहेत2 / 9पाकिस्तानी नेत्यांना कदाचित तो दिवस आठवत नसेल जेव्हा भारतीय सैन्य पाकिस्तानातील दुसरं सर्वात मोठे शहर लाहोरमध्ये घुसले होते. जर त्यादिवशी UNSC ने हस्तक्षेप केला नसता तर आज लाहोर भारताच्या ताब्यात असते. १९६५ च्या युद्धात अखेर काय घडले, ज्याने पाकिस्तान वाचले जाणून घेऊया3 / 9तारीख ६ सप्टेंबर १९६५, हा तोच दिवस आहे ज्यादिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लाहोरवर हल्ला केला होता. भारताने त्यावेळी अशी रणनीती तयार केली होती, ज्यात १९६५ च्या युद्धाची दिशा बदलली होती. पाकिस्तानने वारंवार भारताला उकसवल्याने भारतानेही शत्रूला सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर लाहोर आपल्या ताब्यात जाणार हे पाकला कळलं4 / 9५ ऑगस्ट १९६५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. याला काश्मीरमधील दुसरं युद्ध म्हणूनही ओळखले जाते. या युद्धात दोन्ही देशाचे हजारो सैनिक मारले गेले. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लाहोर येथे हल्ला केला, त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले5 / 9ऑगस्ट १९६५ साली पाकिस्तानचं सीक्रेट मिशन जिब्राल्टरशी निगडीत आहे. पाकिस्तानला जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करायची होती त्यातून त्याला भारताचं काश्मीरवरील नियंत्रण कमी कमकुवत करायचे होते. काश्मीरात मुस्लीम आहेत ते आपल्याला साथ देतील अशी पाकिस्तानला अपेक्षा होती6 / 9याठिकाणी पाकिस्ताननं स्थानिक बंडखोरांना हाताशी धरून अशांतता पसरवण्यास सुरुवात केली. ऑपरेशन जिब्राल्टरनंतर याठिकाणी मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. ज्यातून १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली. काश्मीर हिसकावण्यासाठी पाकिस्तानने पश्चिमी मित्रांच्या मदतीने वेष बदलून सैनिकांना काश्मीरवर कब्जा करण्यासाठी पाठवले. त्यामुळेच काश्मीरचा एक भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. जो आज पाकिस्तान ऑक्यूपाइड काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान नावाने ओळखला जातो7 / 9काश्मीरला उरलेला भाग भारताच्या ताब्यात राहिला. १९६५ च्या युद्धात भारताविरोधात पाकिस्तानने पंजाबपासून काश्मीरपर्यंत मोर्चा उघडला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने रणनीती साधत हाजी पीर दर्ग्यावर कब्जा केला होता. पाकिस्तानी घुसखोर याच मार्गाचा वापर काश्मीरात येण्यासाठी करायचे. आता तो भाग भारताचा झाल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला.8 / 9त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी हाजी पीर दर्ग्याहला पाकिस्तानला परत करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संयुक्त राष्ट्राने युद्ध विराम घोषणा केली आणि ताशकंद करार झाला. ज्यात पाकिस्ताने युद्ध विराम आणि शांतता पाळण्याचे मान्य केले. या युद्धात भारताला पाकिस्तानला त्यांची जमीन परत करावी लागली. नाहीतर भारतीय सैन्य लाहोरपर्यंत पोहचले होते.9 / 9१९६५ च्या युद्धात भारताचा विजय झाला आणि जगाला भारताची ताकद दिसून आली. जर या दोन्ही देशांमध्ये २३ सप्टेंबरला युद्ध विराम झाला नसता तर आज लाहोर भारताच्या ताब्यात असता.