शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 23:31 IST

1 / 4
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार सुरू आहे. तर दोन्हीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की, मर्यादित युद्ध सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2 / 4
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये या संघर्षाला तोंड फुटलं आहे. भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतातील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी कुणीही अद्याप अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मर्यादित स्वरूपाचं युद्ध सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मर्यादित युद्ध आणि युद्ध यातील फरक आपण पाहुयात.
3 / 4
भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झालं आहे. जेव्हा दोन देशांमध्ये युद्धाला तोंड फुटते तेव्हा त्याची अधिकृत घोषणा त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाकडून केली जाते. तसेच देशाच्या जनतेला याची सूचनाही दिली जाते. जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध होते, तेव्हा ते शत्रूराष्ट्राविरोधात आपल्या सर्व शस्त्रास्त्रांचा वापर करतात. युद्धामध्ये दोन्ही देश प्रत्येक प्रकारचं शस्त्र वापरण्यास स्वतंत्र असतात. मात्र मर्यादित युद्धामध्ये अशा घातक हत्यारांचा वापर केला जात नाही.
4 / 4
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाला लिमटेड वॉर किंवा मर्यादित युद्ध म्हणता येईल. मर्यादित युद्ध हे दोन्ही देशांमध्ये पेटणाऱ्या युद्धापेक्षा थोडं वेगळं असतं. यात कुठलाही देश युद्धाची अधिकृत घोषणा करत नाही. दोन्ही देश अशा युद्धामध्ये लष्करी साधनांचा वापर करत नाहीत. तर ड्रोन, गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले होतात. तसेच सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती असते.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान