इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते खास पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:23 IST
1 / 8होळीचा सण जवळ आला आहे. होळीदरम्यान, रंग उडवून छेड काढल्याच्या किंवा इतर घटना सातत्याने घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील संथाळ आदिवासी समाजाने एक आगळीवेगळी प्रथा सुरू केली आहे. 2 / 8संथाळ आदिवासी समाजामध्ये जर कुणी कुठल्या मुलीवर रंग उडवला, तर त्याला लग्न करावं लागतं. या प्रथेबाबत जाणकार सांगतात की, ही प्रथा हजारो वर्षांपासून सुरू आहे. होळीदिवशी महिला आणि पुरुषांमध्ये मर्यादा कायम राहावी, यासाठी ही परंपरा सुरू करण्यात आली होती.3 / 8आधी होळीच्या नावावर तरुणींसोबत गैरवर्तन व्हायचं. तरुणींची छेड काढली जायची. ही बाब विचारात घेऊन हा नवा नियम तयार करण्यात आला. संथाळ आदिवासी समाजात ही परंपरा सुरू आहे. 4 / 8जर या समाजामधील तरुणीवर कुणी चुकून जरी रंग उडवला, तरी सर्वात आधी पंचायतीची बैठ बोलावली जाते. असं करणाऱ्या तरुणाला सर्वांसमक्ष माफी मागावी लागले. 5 / 8तर अनेकदा संबंधितांचं लग्नही लावून दिलं जातं. याबाबतचा निर्णय गावातील ज्येष्ठ व्यक्ती घेतात. संबंधित तरुणीला ती लग्न करण्यास तयार आहे का? असं विचारलं जातं. तिच्या मतानुसार पुढील निर्णय घेतला जातो. तसेच सर्व गावकरी या परंपरेचं कुठलाही प्रश्न न उपस्थित करता पालन करतात. 6 / 8 ही प्रथा सुरू होण्याआधी होळीच्या आडून एकमेकांसोबत गैरवर्तन, अश्लित वर्तन असले प्रकार व्हायचे. तसेच होळी आहे म्हणत अशा प्रकारांचं समर्थन केलं जायचं. 7 / 8त्यामुळे यावर काहीतरी उपाय योजला गेला पाहिजे असं ज्येष्ठ मंडळींना वाटलं. त्यामधून जर एखाद्याने एखाद्या तरुणीवर रंग उडवला, तर त्याला लग्न करावं लागेल किंवा संपूर्ण पंचायतीसमोर माफी मागावी लागेल, असा नियम करण्यात आले. 8 / 8झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमधील गावांत अजूनही ही परंपरा सुरू आहे.