२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:20 IST
1 / 10२०२६ मध्ये राज्यसभेतील राजकीय गणिते बदलणार आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात यावर्षी ७५ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यातील अनेक जागांचे भवितव्य येणाऱ्या राज्यांमधील निवडणुकीवर ठरणार आहे. इतकेच नाही तर अनेक दिग्गज खासदारांचा कार्यकाळ यावर्षी संपणार आहे.2 / 10देशात केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात निवडणुका होणार आहे. ज्यानंतर येथील विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल. २०२६ मध्ये केंद्रीय कॅबिनेटमधील ६ मंत्र्यांची राज्यसभा टर्मही पूर्ण होणार आहे. या नेत्यांचा कार्यकाळ अशावेळी संपणार आहे जेव्हा मोदी सरकारमध्ये मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जाते.3 / 10महाराष्ट्रात रामदास आठवले हे भाजपाच्या पाठिंब्याने २ वेळा राज्यसभेवर गेले आहेत. परंतु अलीकडच्या काळात एनडीएमध्ये आठवले यांचा फारसा प्रभाव राहिला नाही. मुंबई महापालिका निवडणुकीतही जागावाटपात आठवलेंच्या आरपीआयची नाराजी पाहायला मिळाली. त्यात केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक मंत्र्यांना डच्चू मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.4 / 10बिहारमध्ये एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ५ जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेत ज्या खासदारांचा कार्यकाळ संपतोय त्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रेम चंद गुप्ता, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, आरएलएम उपेंद्र कुशवाह, जेडीयूचे हरिवंश नारायण यांचा समावेश होता. याठिकाणी २४३ सदस्य असणाऱ्या विधानसभेत १ राज्यसभेची जागा निवडून आणण्यासाठी ४१ आमदारांची गरज आहे.5 / 10बिहारमध्ये २०२ आमदारांसह एनडीएच्या खात्यात ५ पैकी ४ जागा आल्या तर आश्चर्य नाही. याठिकाणी विरोधकांनी ३५ जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांची एकही जागा निवडून आणण्याची क्षमता नाही. त्यात एमआयएमच्या ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. या समीकरणामुळे आरजेडीचं राज्यसभेतील वर्चस्व कमी होईल. 6 / 10बंगालमध्ये ५ जागांवर निवडणूक होणार आहे. या रिक्त जागांपैकी ४ जागा टीएमसीच्या आहेत. सीपीएमचे विकास रंजन भट्टाचार्य यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपतोय. राज्यात मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात. यामुळे विधानसभेतील परिस्थिती बदलेल, ज्याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकांवर होईल. 7 / 10मध्य प्रदेशातील तीन राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. संख्याबळानुसार २३० सदस्यांच्या विधानसभेत एका राज्यसभेच्या जागेसाठी ५८ मते आवश्यक आहेत. संख्याबळानुसार भाजपा दोन जागा जिंकू शकते तर काँग्रेस एक जागा जिंकू शकते. 8 / 10सध्या राज्यसभेत एनडीएकडे १२९ जागा आहेत तर विरोधी पक्षाकडे ७८ जागा आहेत. त्यामुळे ७५ जागांसाठी होणार्या निवडणुकीमुळे सभागृहाचे राजकीय गणित बदलणार हे निश्चित आहे.9 / 10उत्तर प्रदेशात भाजपाकडे यापैकी आठ जागा आहेत. नोव्हेंबरमध्ये ज्या भाजप खासदारांचा कार्यकाळ संपत आहे त्यात नीरज शेखर, दिनेश शर्मा, हरदीप पुरी, व्हीएस वर्मा, ब्रिज लाल आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि बसपाचे रामजी गौतम यांचा कार्यकाळही नोव्हेंबरमध्ये संपत आहे. 10 / 10यूपी राज्य विधानसभेतील भाजपाचे स्थान पाहता भाजपाच्या आठ जागा टिकून राहण्याची शक्यता आहे आणि समाजवादी पक्षालाही दोन जागा जिंकता येतील. बसपाकडे आपल्या कोणत्याही नेत्याला राज्यसभेत पाठवण्यासाठी संख्याबळ नाही. याचा अर्थ जवळजवळ दोन दशकांनंतर बसपाचा एकही खासदार नसेल.